विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावाला आज 20 जुन रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीने आज महाराष्ट्रभर त्यांच्या कार्यालयांमध्ये गद्दार दिन साजरा केला. July 18 is the real traitor day!!; Why did MLA Sanjay Shirsat say that?
मात्र या मुद्द्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी भन्नाट उत्तर दिले आहे. 20 जून हा उठावाचा दिवस आहे. खरा गद्दार दिन तर 18 जुलै हा आहे. कारण 18 जुलै 1978 या दिवशीच महाराष्ट्रात खंजीराचे राजकारण झाले. हा रक्ताळलेला खंजीर आता उद्धव ठाकरे यांची पाठ शोधतोय, अशा शब्दांमध्ये आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
18 जुलै 1978 रोजी शरद पवार यांनी जनता पक्षाशी हात मिळवणी करून मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले होते. राज्यपाल सादिक अली 19 जुलै 1978 रोजी शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी पाचारण केले होते. हा इतिहास आमदार संजय शिरसाट यांनी समोर आणला. त्यामुळे 18 जुलै 1978 हा खरा गद्दार दिन आहे, असे ते म्हणाले.
त्याच वेळी 1999 मधली आठवण देखील त्यांनी सांगितली. शरद पवारांनी फूस लावल्यामुळेच तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा यांनी काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांच्या विरुद्ध बंड केले होते. पवारांनी काँग्रेसमध्ये ही गद्दारीच केली होती, याची आठवण शिरसाट यांनी करून दिली.
ठाकरे गट आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी गद्दार दिन साजरा केला. त्याचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. पण 1978 आणि 1999 या दोन सालांमधील गद्दारीची आठवण आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला करून दिली.
July 18 is the real traitor day!!; Why did MLA Sanjay Shirsat say that?
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांची पॉप्युलरिटी, भाजपची सलग तिसऱ्यांदा शंभरी, ही तर पवारांची राजकीय कंबख्ती!!
- Maharashtra Drone Mission : देशातील पहिले ड्रोन धोरण आणि इकोसिस्टम महाराष्ट्राने तयार करावे – फडणवीस
- इतरांना गद्दार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचीच खरी गद्दारी; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान
- तीच कॅसेट वाचवू नका, निदान स्क्रिप्ट रायटर तरी बदला; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला