प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे हे दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत आहेत. सरकार पक्षाने १० दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने आजपर्यंत म्हणजे दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हायकोर्टात केलेला अर्ज मागे घेत नितेश राणे शरण गेले होते. राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिले आहे.Judicial custody for Nitesh rane
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर गेल्या १८ डिसेंबरला झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रमुख संशयित नितेश राणे अटक टाळण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत होते. मात्र, पोलिसांकडचे पुरावे आणि कायदेशीर तरतुदी लक्षात घेता ही लढाई यशस्वी होणार नाही, असे दिसताच नितेश यांनी उच्च न्यायालयात केलेला जामीन अर्ज मागे घेतला़. ते न्यायालयाला शरणही आले होते. त्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. नितेश राणे गेल्या दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत होते. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
नितेश राणेंची तब्येत बरी नाही
नितेश राणेंची तब्येत आधीपासूनच बरी नव्हती. पण ठरल्याप्रमाणे, न्यायालयाच्या आदेशामुळे ते पोलीस कोठडीत गेले होते. पण आता नियमित तपासणी होईल, त्यात डॉक्टरांना जे आढळून येईल, त्यानुसार पुढची कार्यवाही होईल. आम्ही फक्त न्यायालयात नमूद केले आहे की त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांना उपचाराची गरज वाटली तर उपचार केले जातील.
कणकवली न्यायालयाने नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावताच लगेचच सत्र न्यायालयात जामिनासाठीचा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राणेंचे वकील सतिश मानेशिंदे आणि संग्राम देसाई यांनी दिली होती. या अर्जावर आता उद्या म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आज न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मुदत वाढवण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती मागणी फेटाळली असून त्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता त्यांचा जामिनासाठीचा अर्ज मोकळा झाला आहे.
पोलिसांनी नितेश राणे यांचं मोबाईल, सिमकार्ड जप्त केलं आहे. आरोपीला पुण्याला नेऊन तपास करणं आवश्यक असल्याचं सांगत पोलिसांची नितेश राणे यांची कोठडीची मुदत वाढवून मागितली होती.
बंधू निलेश राणेंवरही गुन्हा दाखल
धाकटे बंधू नितेश राणे यांच्या अटकेबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणारे माजी खासदार निलेश राणे हेही कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर बेकायदा जमाव जमवल्याचा (कलम १८८) आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी (१८६) निलेश राणे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात बुधवारी ओरोस सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
Judicial custody for Nitesh rane
महत्त्वाच्या बातम्या
- बृहन्मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प विकासाभिमुख, पर्यावरणपूरक महापौर किशोरी पेडणेकर यांचे प्रतिपादन
- तान्हाजी मालुसरे यांचा आज हौतात्म्य दिन सिंहगड किल्ल्यावरील युद्धात गाजवला अविस्मरणीय पराक्रम
- पर्यावरण संवर्धन साधत असताना शाश्वत विकास ८ व ९ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन मंथन परिषद
- हिमाचल प्रदेशात 677 रस्ते वाहतुकीसाठी बंद 98 पिण्याच्या पाण्याच्या योजना ठप्प