प्रतिनिधी
मुंबई : एसटी महामंडळाच्या पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांकरिता कंत्राटदारामार्फत १०५० वाहक पुरवण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी एसटी महामंडळ निवृत्त वाहकांची भरती करणार आहे. राज्यात आता मोठ्या प्रमाणात कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे.Job Opportunity: ST Corporation Recruitment 1050 Contract Carrier Soon
1050 कंत्राटी वाहक भरती
3 वर्षांसाठी वाहकरूपी कर्मचारी पुरवठा करावा लागणार असल्याचे निविदेत नमूद केले आहे.
या पूर्वी कंत्राटीपद्धतीने केलेली भरती ही एसटी महामंडळाने थेट स्वतः केली होती. यावेळी प्रथमच ती ठेकेदारामार्फत होणार आहे.
यातून एसटी महामंडळाचे खासगीकरण करून ते भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेने केला आहे.
शेकाप युवक संघटनेचा विरोध
या संदर्भात पुरोगामी युवक संघटनेचे इंजिनिअर अभिजित कदम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एकीकडे शासनात विलिनीकरणसाठी एसटी कर्मचारी संघर्ष करत असताना दुसरीकडे खासगीकरणाचा घाट घातल्याचे हे विदारक चित्र आहे. महाराष्ट्रभर ठेकेदारामार्फत वाहक पुरवले गेल्यास भविष्यात एसटी महामंडळ भांडवलदारांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. याचा पुरोगामी युवक संघटना निषेध करत आहे. एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा डाव त्वरित थांबवावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही कदम यांनी दिला आहे.
Job Opportunity: ST Corporation Recruitment 1050 Contract Carrier Soon
महत्वाच्या बातम्या
- Commonwealth Games 2022 : लॉन बॉल स्पर्धेत भारतीय महिलांची सोनेरी कामगिरी!!
- संजय राऊत म्हणाले, पेढे वाटा!!; बाळासाहेबांच्या ड्रायव्हरने खरंच वाटले!!
- हडपसरमधील उद्यानाचा झटपट नावबदल; एकनाथ शिंदेंऐवजी उद्यानाला धर्मवीर आनंद दिघेंचे नाव!!
- #बॉयकॉट रक्षाबंधन : अक्षय कुमारच्या रक्षाबंधनची नायिका कनिका ढिल्लनने आता हटवली हिंदू विरोधी ट्विट्स!!