प्रतिनिधी
मुंबई : इंडियन बॅंकेत नोकरी करण्याची संधी आली आहे. बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी रिक्त जागांवर भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत साइट indianbank.in द्वारे या पदांसाठी अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 आहे.Job Opportunities: Recruitment of over 300 posts in Indian Bank; Apply online
रिक्त जागा
इंडियन बॅंकेतील भरती मोहिमेद्वारे विशेषज्ञ अधिका-यांच्या 312 पदांची भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा
या भरतीअंतर्गत काही पदांसाठी अर्ज करण्याचे कमाल वय 30 वर्षे, काहींसाठी 35 वर्ष तर काहींसाठी 38 वर्ष आणि 40 निश्चित करण्यात आले आहे.
असा करा अर्ज
indianbank.in ला भेट द्या.
होम पेजवर दिलेल्या करिअर विभागात जा.
आता येथे स्पेशलिस्ट ऑफिसर्स 2022 च्या भर्तीच्या लिंकवर क्लिक करा.
नोंदणीसाठी या लिंकवर क्लिक करा.
आता उमेदवाराचा मेल आयडी टाकून नोंदणी करा.
त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
आता अर्जाची फी भरा.
शेवटी सबमिट वर क्लिक करा.
Job Opportunities: Recruitment of over 300 posts in Indian Bank; Apply online
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : राज्यसभेच्या निवडणुका कशा होतात? विजयाचे सूत्र काय आहे? जाणून घ्या, संपूर्ण प्रक्रिया
- Kashmir targeted killings : हे आहे वास्तव!!; हालात सुधरे, आतंकी बिगडे!!
- राज्यसभा निवडणूक 2022 : महाराष्ट्रात 1998 ची पुनरावृत्ती होणार??; काँग्रेसचे राम प्रधान झाले होते पराभूत!! मग यंदा पडेल कोण??
- औरंगाबाद, उस्मानाबादचे खरंच नामांतर??, की मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी चर्चेची नुसतीच पुडी??