• Download App
    राज्य सरकारचा जिझिया कराचा फतवा, वाहतूक गुन्ह्याच्या प्रलंबित दंडाच्या रकमेवर आता भरावा लागणार दहा पट दंड|Jizya tax fatwa of state government, pending fines for traffic offenses will now have to pay ten times the fine

    राज्य सरकारचा जिझिया कराचा फतवा, वाहतूक गुन्ह्याच्या प्रलंबित दंडाच्या रकमेवर आता भरावा लागणार दहा पट दंड

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : कोरोनाच्या महामारीमुळे बेजार झालेल्या नागरिकांना राज्य सरकारने आणखी एक हादरा दिला आहे. राज्य सरकारने जिझिया करापेक्षाही मोठा दंड आकारण्याची तयारी केली आहे. आता वाहतुकीच्या प्रलंबित गुन्ह्यांवर दहापट दंड आकारण्यात येणार आहे. यामध्ये हेल्मेट न वापरण्याच्या गुन्ह्याचाही समावेश असल्याने आडमार्गाने हेल्मेट सक्ती आणण्याचाही राज्याचा प्रयत्न आहे.Jizya tax fatwa of state government, pending fines for traffic offenses will now have to pay ten times the fine

    वाहतूक गुन्ह्यांसाठी ऑनलाइन दंड प्रलंबित असलेल्या वाहनचालकांना आता त्यादंडाऐवजी दहापट अधिक दंड भरावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, प्रलंबित ई-चालानवरही नवीन दंड आकारण्यात येणार आहे. याअंतर्गत लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास पाचशे रुपयांचा दंड प्रलंबित असेल तर त्याऐवजी पाच हजार रुपये भरावे लागतील. या निर्णयाचा नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.



    नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत वाढीव दंड आकारण्याबाबत राज्य सरकारने नुकतीच अधिसूचना जारी केली आहे. ही सूचना फक्त तडजोड शुल्काशी संबंधित आहे. हेल्मेट न घातल्यास 500 रुपयांच्या दंडासह तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जाईल.

    विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या चालकाचा परवानाही तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल. वाहनाचा नंबर किंवा फॅन्सी नंबर प्लेट, रिफ्लेक्टर किंवा टेललाइटमध्ये छेडछाड केल्याबद्दल 1,000 रुपयांच्या दंडाचा समावेश आहे. सर्व गुन्ह्यांसाठी पहिल्या गुन्ह्यासाठी 500 रुपये आणि दुसºया गुन्ह्यासाठी 1,500 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

    हेल्मेट दंडात वाढ झालेली नाही पण राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हेल्मेट न घातल्याच्या पहिल्या प्रकरणात दंडात वाढ करण्यात आलेली नाही. सध्या 500 रुपये दंड आकारला जात असून तीन महिन्यांसाठी परवाना रद्द करण्यात येणार आहे. मात्र, हेल्मेट न घालण्याचा दुसरा गुन्हा आढळल्यास संबंधित व्यक्तीला १५०० रुपये भरावे लागतील.

    शहरात एकापेक्षा जास्त गुन्ह्यांसाठी प्रलंबित दंडांची संख्या सर्वाधिक आहे. त्यात प्रामुख्याने ह्यहेल्मेटह्ण दंडाचा समावेश आहे. हेल्मेटच्या पहिल्या गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीला पाचशे रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी पंधराशे रुपये भरावे लागण्याची शक्यता आहे.

    पुण्यात मार्च 2017 पासून ई-चलानद्वारे कारवाई करण्यात येत आहे. तेव्हापासून आतापर्यंत 150 कोटी रुपयांहून अधिक दंड वाहनचालकांकडून वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड प्रलंबित असलेल्या पुणेकरांना नव्या स्लॅबनुसार दंड भरावा लागणार असून, तो काहीशे कोटी रुपयांचा होण्याची भीती व्यक्त होत आहे.

    महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी सांगितले आहे की, तुम्ही सध्या वाहनचालकांच्या नावावर प्रलंबित असलेल्या वाहतूक उल्लंघनाचा जुना दंड भरण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांना दंडाची सुधारित रक्कम भरावी लागेल. राज्यातील वाहतूक पोलिसांची ई-चलान प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.

    Jizya tax fatwa of state government, pending fines for traffic offenses will now have to pay ten times the fine

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!