विशेष प्रतिनिधी
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समावेत लोकमान्य टिळक पुरस्काराच्या व्यासपीठावर बसून झाल्यानंतर शरद पवार आज महाविकास आघाडी आणि शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये सहभागी होत आहेत. मात्र शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आज त्यांच्या वाढदिवशी पाच ऑगस्ट रोजी अज्ञात स्थळी गेले आहेत मी अस्वस्थ आहे आज कोणाला भेटू शकत नाही अशा आशयाचे ट्विट करून ते अज्ञात स्थळी रवाना झाले. Jitendra Awad on his birthday at an unknown place
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते यांची बैठक नेहरू सेंटर मध्ये होत आहे. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरदनिष्ठ राष्ट्रवादीची बैठक होत आहे. पवार पंतप्रधान मोदींसमवेत लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमात व्यासपीठावर बसले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्याचा पवार प्रयत्न करीत आहेत या पार्श्वभूमीवर शरदनिष्ठ राष्ट्रवादीतले महत्त्वाचे नेते जितेंद्र आव्हाड मात्र अज्ञात स्थळी गेले आहेत. त्यामुळे आव्हाड यांनी हा स्टंट केला आहे की त्यांना राजकीय दुःख झाले आहे??, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेले ट्विट असे :
उद्या 5 ऑगस्ट… माझा वाढदिवस. लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असतं. वर्षभराची ताकत 5 तारखेला मिळते. पण मला माफ करा. ह्या 5 तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही. देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असे मला अजिबात वाटत नाही. तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत. हीच माझी ताकत आहे. हीच माझी संपत्ती आहे.
पण तरीही मला माफ करा. मी आज रात्री बारापासून ते उद्या रात्री बारापर्यंत स्वतःचा फोन बंद करून मी अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे. लोक किती स्वार्थी असतात हे माझ्या उघडपणाने लक्षात आलं. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात. ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात. हा अनुभव मला नवीन आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर अस्वस्थ मनाने मी कोणालाच भेटू इच्छित नाही. कृपया माफ करा. मी उद्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. : जितेंद्र आव्हाड
Jitendra Awad on his birthday at an unknown place
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ जवान शहीद, लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरू
- राहुल गांधी कायद्याच्या नजरेत दोषीच, फक्त शिक्षेला स्थगिती दिल्याने ते संसदेत येऊ शकतात; महेश जेठमलानींनी मांडली वस्तूस्थिती!!
- २०३० पर्यंत देशात ८०० ‘वंदे भारत’ ट्रेन धावतील, आर के सिंह यांनी सांगितली सरकारची योजना
- आयुष्यातलं सगळ्यात पहिलं नाटक पाहून सैराट फेम रिंकू भावुक, डोळ्यात पाणी आणि मी स्तब्ध असं म्हणत शेअर केल्या भावना