विशेष प्रतिनिधी
पुणे : रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा जिजाई रमाई समाजभूषण पुरस्कार – २०२२ वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या वृषाली रणधीर यांना दिला जाणार असल्याची माहिती रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. Jijai Ramai Samajbhushan Award Announced to Dr. Vrushali Randhir
वाडिया महाविद्यालय येथे प्राध्यापिका आणि आता प्राचार्य म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या वृषाली रणधीर यांनी फुले- शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये मोठे योगदान दिले आहे. मी सावित्रीबाई फुले बोलतेय! या एकपात्री नाटिकेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात हजारो प्रयोग करून सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजात आणि तळागाळात पोहोचविण्याचे काम प्रा. रणधीर यांनी केले आहे.
यंदाचे पुरस्काराचे ७ वे वर्ष असून गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर, कॉम्रेड मुक्ता मनोहर, मोलकरीण संघटनेच्या मेधा थत्ते, कम्युनिस्ट नेत्या किरण मोघे यांना रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने जिजाई रमाई पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यंदाही दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे येत्या १० फेब्रुवारी रोजी पुण्यातील लाल महाल येथे सायंकाळी सहा वाजता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.
Jijai Ramai Samajbhushan Award Announced to Dr. Vrushali Randhir
महत्त्वाच्या बातम्या
- समाजवादी पक्षाने कब्रिस्तानच्या सीमा भिंतीसाठी खर्च केला तर आमच्या सरकारने तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांचा विकास केला, योगी आदित्यनाथ यांचा आरोप
- योगी आदित्यनाथांना काळे झेंडे दाखविणाऱ्या तरुणीला अखिलेश यादवांचे मोठे बक्षीस, थेट विधानसभेची दिली उमेदवारी
- सर्वसामान्य लोकांचे डोके चक्रावून टाकणाऱ्या घोषणा डॉ.नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया
- किराणा दुकानातून वाईन विक्री विरोधात ‘रिपाइं’ची निदर्शने दुकानात घुसून ‘बाटली फोडो’ आंदोलन करण्याचा इशारा