वृत्तसंस्था
अमरावती : केवळ नुपूर शर्मा हिच्या काही पोस्ट फॉरवर्ड केल्याने अमरावतीतील व्हेटर्नरी मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची काही जिहादी मारेकऱ्यांनी हत्या केली. आता त्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने ताब्यात घेतला आहे. 21 जून रोजी झालेल्या या हत्येचा खुलासा आज अमरावतीचे डीसीपी विक्रम साळी यांनी देखील केला आहे. Jihadi killer of Umesh Kolhe of Maravati captured on CCTV
या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा धागादोरा हाती लागला असून उमेश कोल्हे यांचे मारेकरी एका ठिकाणच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. उमेश कोल्हे हे त्यांचा मुलगा आणि सून यांच्यासह दुकान बंद करून घराकडे निघाले असताना अचानक चार-पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांना धारदार शस्त्राने मारले.
सुरुवातीला लुटमारीच्या हेतूने हे घडल्याचे पोलिसांनी दाखवले होते. परंतु, आता विशेषतः उदयपूर मधल्या जिहादी हत्येच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत देखील अशी घटना आधीच घडल्याचे लक्षात आले आहे.
त्याचबरोबर उमेश कोल्हे हत्या प्रकरणातल्या एका आरोपीने नुपूर शर्मा प्रकरणाचा उल्लेख आपल्या कबुली जबाबात दिल्याने त्याचे गांभीर्य वाढले आहे. आता त्या पलिकडे या संदर्भातला एक महत्त्वाचा पुरावा आणि धागादोर हाती आला असून उमेश कोल्हे यांचे मारेकरी सीसीटीव्हीत एका ठिकाणी कैद झाल्याची बातमी आहे. या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्था एनआयए पुढचा तपास करत आहे.
Jihadi killer of Umesh Kolhe of Maravati captured on CCTV
महत्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्ष निवडणूक : पहिली लढाई व्हीपची; शिवसेनेच्या दोन गटांची!!
- मणिपूर भूस्खलनात 81 जण दबले : 15 जवान आणि 5 नागरिकांचे मृतदेह बाहेर काढले, 18 जणांना वाचवले; 55 साठी शोध सुरू
- Petrol Diesel Export Tax : देशात इंधन तेलाचा तुटवडा भासणार नाही, मोदी सरकारचे पेट्रोल-डिझेलच्या निर्यातीवर कठोर पाऊल
- एकनाथ शिंदेंविरोधातील कारवाईला कायद्याने उत्तर; दीपक केसरकरांचा शिवसेनेला इशारा