विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात मूळात शिंदे – फडणवीस सरकार टिकणार नाही. पण ते टिकले आणि राज्यात केव्हाही विधानसभा निवडणुका झाल्या तरी भाजपला 40 ते 60 जागा मिळतील. महाराष्ट्राची जनता मतपेटीतून या सरकार वरचा आपला राग व्यक्त करेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. टीव्ही 9 मराठीने महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या सर्व नेत्यांच्या मुलाखती घेतल्या.Jayant patil claimed BJP will get only 40 to 60 seats in maharashtra assembly elections, but is he co relating BJP’s election performance with NCP’s double digit performance??
जयंत पाटलांनी दिलेली मुलाखत हा या मालिकेचा एक भाग होता. या मुलाखतीतच त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला 40 ते 60 जागा मिळतील, असे भाकित केले आहे. मोदींच्या चेहऱ्याखेरीज भाजपकडे दुसरा चेहरा नसल्याचाही दावा जयंत पाटलांनी केला आहे.
पण मूळ मुद्दा आहे की भाजपला 40 ते 60 जागा मिळतील म्हणजे त्यांना डबल डिजिट आकड्यात जागा मिळतील हा आकडा जयंत पाटलांनी नेमका कुठून काढला असेल?? कारण 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजप हा एकमेव राजकीय पक्ष आहे, की ज्याने महाराष्ट्रात तिहेरी आकडा गाठला होता. म्हणजे विधानसभा निवडणुकीत दोनदा शंभरी पार केली होती. आजही महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे 106 आमदार आहेत. त्यापैकी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे भाजपचा आजचा आकडा 104 चा आहे. याचा अर्थ भाजप आजही म्हणजे 2023 मध्ये ट्रिपल डिजिट आकड्यात आमदार बाळगून आहे. अशा स्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप ट्रिपल डिजिट मधून डबल डिजिट वर घसरेल आणि भाजपचे 80 – 90 नव्हे, किंवा 70 – 80 नव्हे, तर 40 ते 60 आमदार निवडून येतील, हा आकडा जयंत पाटलांनी नेमका काढला कुठून??, याचे नेमके रहस्य काय असेल??, याचा बारकाईने आढावा घेतला तर जयंत पाटलांनी, ते ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय परफॉर्मन्सचा आढावा घेऊन आकडा काढला आहे का??… तशीच शक्यता वाटते.
1999 पासून 2019 पर्यंत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडून आणलेल्या आमदारांची संख्या पाहिली तर ती 40 ते 60 एवढीच राहिली आहे. आणि एकदाच फक्त राष्ट्रवादीने सत्तरी ओलांडली आहे. 2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 72, तर काँग्रेसला 69 आमदार निवडून आणता आले होते. पण हा एकमेव अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या नेहमीच 40 ते 60 या रेंजमध्येच राहिली आहे. याचा अर्थ जयंत पाटलांनी भाजपचा निवडणूक परफॉर्मन्स हा राष्ट्रवादीच्या निवडणूक परफॉर्मन्सशी को – रिलेट करून सांगितला आहे का?? हा प्रश्न पडतो.
वास्तविक ज्या दिवशी अखंड काँग्रेस तुटून राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात आली, त्या दिवसापासून काँग्रेसचीही अशीच घसरण राहिली आहे. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसने 84 आमदार निवडून आणले होते. त्यावेळी राष्ट्रवादीला 62 आमदार निवडून आणता आले होते. त्यावेळी दोघांमधली तफावत जरी मोठी असली तरी दोन्ही पक्षांचा निवडणूक परफॉर्मन्स डबल डिजिटमध्येच राहिला होता. काँग्रेसने 1990 च्या निवडणुकीत 141 आमदार निवडून आणले होते. हा त्यांचा 2023 पर्यंत तरी शेवटचा ट्रिपल डिजिट आकडा राहिला आहे. राष्ट्रवादीने तर स्थापनेपासून आत्तापर्यंत गेल्या 24 वर्षांमध्ये कधीच ट्रिपल डिजिट आकडा गाठलेला नाही. शरद पवार राष्ट्रीय नेते असूनही त्यांना महाराष्ट्रात राष्ट्रवादीला फक्त डबल डिजिट आमदारच निवडून आणता आले आहेत.
त्या उलट भाजपने सलग 2 निवडणुकांमध्ये ट्रिपल डिजिटचा आकडा गाठला आहे. तरी देखील जयंत पाटील जर भाजपला 40 ते 60 जागा मिळणार असे भाकीत करत असतील तर ते निश्चितपणे राष्ट्रवादीचेच प्रतिबिंब भाजपमध्ये पाहत आहेत आणि ते राष्ट्रवादीच्याच राजकीय परफॉर्मन्सच्या जाळ्यात अडकले आहेत, असे म्हणावे लागेल.
Jayant patil claimed BJP will get only 40 to 60 seats in maharashtra assembly elections, but is he co relating BJP’s election performance with NCP’s double digit performance??
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी आज बंगळुरूत करणार एअरो इंडिया शोचे उद्घाटन : सुपरसॉनिक विमानांचे दिसेल थरारक उड्डाण
- दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचे उद्घाटन : मोदी म्हणाले- सीमेवर रस्ता बांधायला घाबरायची काँग्रेस, त्यांना सैनिकांच्या शौर्यावर संशय होता
- बिग बॉस 16चा किताब पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनला : शिव ठाकरे रनरअप, सलमानसाठी प्रियांका चौधरी राहिली खरी विनर
- पैसा नाही कमी पडणार!; बंजारा समाजासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा 593 कोटींचा विकास आराखडा!!