• Download App
    जावेद अख्तरांकडून आधी तालिबानची निंदा आणि आता संघ – विश्व हिंदू परिषद – बंजरंग दलाशी केली तुलना । Javed Akhtar's earlier condemnation of Taliban and now comparison with Sangh - Vishwa Hindu Parishad - Banjarang Dal

    जावेद अख्तरांकडून आधी तालिबानची निंदा आणि आता संघ – विश्व हिंदू परिषद – बंजरंग दलाशी केली तुलना

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बॉलिवूडचे गीतकार – संवाद लेखक जावेद अख्तर यांच्या लिबरल विचारांचे खरे रूप बाहेर आले आहे. जावेद अख्तरांनी आधी तालिबानची निंदा करून घेतली. पण संपूर्ण अफगाणिस्तानात धर्मांध राजवट राबविणाऱ्या तालिबानची तुलना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाशी करून आपली मूळ फितरत दाखवून दिली. Javed Akhtar’s earlier condemnation of Taliban and now comparison with Sangh – Vishwa Hindu Parishad – Banjarang Dal

    एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तरांनी तालिबानवर टीका केली हे खरे आहे. कारण त्यांच्या विचारसरणीतून इस्लामी हिंसाचार आणि दहशतवादच फैलावतो. ते इस्लामच्या नावाखाली उघडपणे हिंसाचाराचे समर्थन करतात. पण संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल त्या हिंसाचाराच्या प्रतिकाराची बात करतात. हिंदूंच्या हिंसाचाराचे एकतर्फी समर्थन करीत नाहीत, याकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करून जावेद अख्तरांनी संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची तुलना तालिबानशी करून टाकली.



    शिवाय मुसलमानांच्या धर्मांध गटाला एक लहानसा गट असे संबोधून ते मुसलमानांना मध्ययुगीन मानसिकतेत ठकलत आहेत. स्त्री – पुरूष असा भेद निर्माण करून महिलांना कमी लेखत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. आजचा मुसलमान तरूण चांगले जीवन, शिक्षण, रोजगार यासाठी काम करतोय असा दावाही जावेद अख्तर यांनी केला आहे.

    यातून जावेद अख्तर यांनी सुप्तपणे मुसलमान मानसिकतेचे समर्थनच केले आहे. त्यांनी ज्या प्रकारे संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची तुलना तालिबानशी केली आहे, त्या प्रकारे मुसलमान समाजाला दोष देणेही टाळले आहे.

    Javed Akhtar’s earlier condemnation of Taliban and now comparison with Sangh – Vishwa Hindu Parishad – Banjarang Dal

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!