विशेष प्रतिनिधी
मुंबई : अमेरिका ही कसली महासत्ता आहे की, ती तालिबान नावाच्या या रानटी लोकांना संपवू शकली नाही. हे कसं जग आहे ज्याने अफगाण स्त्रियांना या मूलतत्त्ववाद्यांच्या दयेवर सोडले आहे. मानवाधिकारांचे रक्षक असल्याचा दावा करणाºया सर्व पाश्चिमात्य देशांना लाज वाटली पाहिजे, अशी टीका गीतकार जावेद अख्तर यांनी अमेरिकेसह पाश्चात्य देशांवर केला आहे. Javed Akhtar: Shabana Azmi’s Criticism of US, What kind of superpower could not eradicate the savages called Taliban
अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने काबूलवर कब्जा केला आहे. सध्या अफगाणिस्तानची परिस्थिती वाईट आहे. लोकांना देश सोडून जायचे आहे. काबूल विमानतळावर मोठ्या संख्येने लोक दिसत आहेत. प्रत्येकजण याचा तीव्र निषेध करत आहे. जावेद अख्तर यांनीही टीका केली आहे.
शबाना आझमी यांनी लिहिले की, इतिहासाने आम्हाला शिकवले आहे की धर्मांधांनी धर्माच्या नावावर संस्कृतीवर प्रथम हल्ला केला. लक्षात ठेवा की तालिबान्यांनी सहाव्या शतकातील बामियानचे पुतळे (बामियान बुद्ध) कसे पाडले होते. हे क्रूरतेकडे निर्देश करते.
Javed Akhtar: Shabana Azmi’s Criticism of US, What kind of superpower could not eradicate the savages called Taliban
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : लेबनॉनमध्ये इंधनाच्या टँकरचा भीषण विस्फोट, 28 जणांचा मृत्यू, संतप्त जमावाने टँकर मालकाचे घरही जाळले
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा, म्हणाले- आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवण्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका
- Lockdown In Maharashtra : ‘तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन’, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला थेट इशारा