मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील ५८ आणि पुण्यासह नाशिक येथील ३ जैन मंदिरांना वषार्तील नऊ दिवसांच्या उपवासासाठीच्या आयंबिल ओळी तपदरम्यान सेवन केले जाणारे विशेष अन्न लोकांच्या घरी पार्सल देण्याची परवानगी दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील ५८ आणि पुण्यासह नाशिक येथील ३ जैन मंदिरांना वषार्तील नऊ दिवसांच्या उपवासासाठीच्या आयंबिल ओळी तपदरम्यान सेवन केले जाणारे विशेष अन्न लोकांच्या घरी पार्सल देण्याची परवानगी दिली आहे.Jain aaybil oli food parcels to be allowed consumed
कोणत्याच परिस्थितीत कोणत्याही भाविकांना उपवासादरम्यान मंदिरात जाता येणार नाही, असे न्यायाधीश एस.सी. गुप्ते आणि न्यायाधीश अभय अहुजा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. उपवास १९ ते २७ एप्रिलदरम्यान असतील.
जैन समुदायातील बांधवांना उपवासावेळी सेवन केल्या जाणाऱ्या जेवणाचा डबा ट्रस्ट परिसरातून घेऊन जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी याचिका जैन ट्रस्टद्वारे दाखल करण्यात आली होती.
याचिकेवरील सुनावणीदरम्यान ट्रस्टचे अधिवक्ता प्रफुल्ल शाह यांनी फक्त त्यांच्या जेवणाचा डबा येथून घेऊन जावा, एवढेच आमचे म्हणणे असल्याचे सांगितले. उपवासाचे जेवण स्वयंसेवकांच्या मदतीने भाविकांच्या घरी पोहोचविण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
Jain aaybil oli food parcels to be allowed consumed
महत्वाच्या बातम्या
- गरीब देशांमध्ये महिलांचे भोग काही केल्या सरेनात, त्यांच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध, ‘यूएन’च्या अहवालातील माहिती
- सीआयएससीईने दहावी-बारावीच्या परीक्षा केल्या स्थगित, अंतिम निर्णय जूनच्या पहिल्या आठवड्यात
- शोलेचा डायलॉग भाजप नेत्याला पडला महागात, २४ तासांत खुलासा करण्याचा आयोगाचा आदेश
- येडीयुरेप्पा, दिग्विजयसिंह, सुरजेवाला यांनाही कोरनाने गाठले, राजकीय नेत्यांमध्ये मोठी लागण