• Download App
    Jai Kanhaiya Lal ki: Krishna Janmashtami celebrations across the country; Greetings from PM Modi to the countrymen

    Jai Kanhaiya Lal ki : देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष ; PM मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा

    देशात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमीचा सण हा जल्लोषात साजरा केला जात आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशभरात आज कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे. भगवान कृष्णाचा जन्म जन्माष्टमीच्या दिवशी झाला होता. जो भगवान विष्णूचा 8 वा अवतार मानला जातो. त्यामुळेच जन्माष्टमीनिमित्त देशभरात अनेक मंदिरांमध्ये कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. दरम्यान, कोरोना संकटामुळे यंदाही दहीहंडी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. Jai Kanhaiya Lal ki: Krishna Janmashtami celebrations across the country; Greetings from PM Modi to the countrymen

    दरम्यान, असं असलं तरी देशभरातील अनेक मंदिरं ही सुशोभित करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मात्र, कोरोना संकटामुळे मंदिरे ही अद्यापही सुरु करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे भाविकांना मंदिरामध्ये जाऊन पूजा-अर्चा करता येणार नाही.

    यावर्षी श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी द्वापर युगासारखा योग आल्याचं ज्योतिष तज्ज्ञांचं म्हणणं आहे. श्री कृष्णाचा जन्म भद्रा कृष्ण अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीत झाला होती. यावर्षीही असाच एक योग जन्माष्टमीच्या दिवशी होत आहे. यावर्षी जन्माष्टमीचा सण आज (सोमवार 30 ऑगस्ट) रोजी साजरा केला जात आहे.

    दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये मंदिरं सुरु करण्यात आली असून मथुरेतील प्रसिद्ध राधा-कृष्ण मंदिरात सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.

    दरम्यान, श्रीकृष्ण जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘आपणा सर्वांना जन्माष्टमीच्या अनेक शुभेच्छा. जय श्रीकृष्ण!’

    याचवेळी गृहमंत्री अमित शहा यांनी देखील जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्व देशवासियांना शुभेच्छा. जय श्रीकृष्ण!’

    Jai Kanhaiya Lal ki: Krishna Janmashtami celebrations across the country; Greetings from PM Modi to the countrymen

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!