विशेष प्रतिनिधी
मुंबई : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आज शिवसेनेच्या नेत्यांना जाळ्यात ओढले असून आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती राहुल कनाल यांच्या घरांवर छापे सुरू असतानाच परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्ती संजय कदम यांच्या घरावर इन्कम टॅक्स छापे पडल्याची बातमी आली आहे. IT Raids Shivsena: Income tax raids on Sanjay Kadam’s house near Anil Parab now !!
“हे” तर दिल्लीचे महाराष्ट्रावरचे आक्रमण आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी राहुल कलाल यांच्या घरावरील छाप्यांवर व्यक्त केली आहे. मात्र, ही प्रतिक्रिया येते न येते तोच अनिल परब यांचे निकटवर्ती आणि अंधेरी पश्चिम मतदार संघ विभागाचे शिवसेना संघटक संजय मानाजी कदम यांच्या घरावर इन्कम टॅक्स छापे पडल्याची बातमी आली आहे.
– यशवंत जाधव ते संजय कदम
शिवसेनेच्या नेत्यांवरचे छापासत्र मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरांवरील छाप्यांपासून सुरू झाले आहे. त्यांच्या घरांवर तसेच त्यांच्याशी संबंधित कंत्राटदार यांच्या 35 ठिकाणांवर असेच काही दिवसांपूर्वी छापे घातले होते. त्यानंतर हे छापा सत्र आज पुन्हा सुरू झाले आहे.
यातले पहिले छापे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती, शिर्डी संस्थानचे विश्वस्त आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कलाल यांच्या मुंबई आणि पुण्याच्या घरांवर पडले आहेत आणि त्यानंतर अनिल परब यांच्या निकटवर्ती संजय मानाजी कदम यांच्या घरावर छापे पडल्याची बातमी आली आहे. हे छापे एकाच वेळी सुरू झाले आहेत.
संजय राऊत यांची दुपारी पत्रकार परिषद
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे आज दुपारी 4.00 वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. संजय राऊत यांनी पंतप्रधान कार्यालयाला 13 पानी पत्र लिहिले आहे. यामध्ये केंद्रीय तपास संस्थांच्या अधिकार्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे पत्र त्याच पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर ठेवणार आहेत.
IT Raids Shivsena : Income tax raids on Sanjay Kadam’s house near Anil Parab now !!
महत्त्वाच्या बातम्या
- Islamic State : पुण्याच्या कोंढव्यातील संशयित तल्हा खानच्या घरावर NIA चे छापे; खुरासन प्रांत, अबुधाबी मोड्यूलशी कनेक्शन उघडकीस!!
- पुण्यातील कोंढव्यात एनआयएकडून छापेमारी, दहशतवादी संघटनेच्या संशयितांच्या घराच्या घेतली झडती
- ममता बॅनर्जी विमान अपघातातून बचावल्या की पुन्हा एकदा आरोपांची नवटंकी
- एक्झिट पोलमध्ये पंजाबमध्ये आपच्या विजयाच्या शक्यतेने बड्या कॉँग्रेस नेत्यांना स्वत;ची चिंता, राज्यसभेची मुदत संपत असल्याने निवडून कसे यायचे हाच पेच
- काँग्रेस-राष्ट्रवादीचा शिवसेनेला कात्रजचा घाट, एकत्र निवडणूक लढवूनही पदाधिकारी निवडीत ठेवले दूर