• Download App
    IT raids : संजय राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्स आधीच आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे!!। IT raids: Income tax raids on Aditya Thackeray's close aide Rahul Kanal's house before Sanjay Raut's press conference !!

    IT raids : संजय राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्स आधीच आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या आजच्या प्रेस कॉन्फरन्स आधीच शिर्डी देवस्थानचे एक विश्वस्त आणि आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेचे कोअर कमिटीतील एक सदस्य राहुल कनाल यांच्या मुंबईतल्या घरावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातले आहेत. IT raids: Income tax raids on Aditya Thackeray’s close aide Rahul Kanal’s house before Sanjay Raut’s press conference !!

    इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे छापे सध्या सुरू असून तेथे नेमके काय सापडते याचे तपशील अद्याप बाहेर आलेले नाहीत. राहुल कनाल हे शिर्डी देवस्थानचे विश्वस्त असून मातोश्रीच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. विशेषत: आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेच्या कोअर कमिटीचे ते एक सदस्य सदस्य आहेत.



    राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी बनविण्याच्या वेळी शिवसेनेकडून राहुल कनाल यांच्या नावाची चर्चा होती. मुंबई महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे पण ते सदस्य होते.

    संजय राऊत हे आज दुपारी चार वाजता शिवसेना भवन मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन केंद्रीय तपास यंत्रणांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असणारे 13 पाणी पत्र सादर करणार आहेत. परंतु, त्या आधीच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ॲक्शन मोड मध्ये येऊन त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयाच्या घरांवर छापे घातले आहेत.

    IT raids: Income tax raids on Aditya Thackeray’s close aide Rahul Kanal’s house before Sanjay Raut’s press conference !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!