• Download App
    दगडफेक कोणी केली हा तपासाचा भाग; दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य । It is part of the investigation into who threw the stones Statement of Dilip Walse Patil

    दगडफेक कोणी केली हा तपासाचा भाग; दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : दगडफेक झाली आहे हे खरे आहे. ती कुणाकडून झाली काय झाली, हा तपासाचा भाग आहे. त्याचा तपास करून पोलीस योग्य ती कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.  It is part of the investigation into who threw the stones Statement of Dilip Walse Patil

    राणा दांपत्याची पोलीस ठाण्यात भेट घ्यायला गेलेल्या भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर संतापलेल्या शिवसैनिकांनी काल रात्री हल्ला केला. या हल्यात सोमय्या किरकोळ जखमी झाले.



    या संदर्भात विचारले असता वळसे पाटील यांनी दगडफेक झाल्याचे मान्य केले. परंतु ती कोणी केली हा तपासाचा भाग असल्याचे सांगत यासंदर्भात सगळ्यांनी समजुतीने घ्यावे असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.

    किरीट सोमय्या राणा दांपत्याची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी शिवसैनिकांना बाजूला करुन सोमय्यांची गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान एका शिवसैनिकाने गाडीवर दगड भिरकावल्याने गाडीची काच फुटली. सोमय्या या घटनेत किरकोळ जखमी झाले त्यांच्या चेहऱ्याला थोडीशी दुखापत झाली.

    It is part of the investigation into who threw the stones Statement of Dilip Walse Patil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!