• Download App
    जालना येथील प्रकरण-महिलेच्या पायांना स्पर्श करणं हाही विनयभंगच ! मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकालIt is indecent to touch any part of a woman without her consent.

    AURANGABAD :२०१४-जालना येथील प्रकरण-महिलेच्या पायांना स्पर्श करणं हाही विनयभंगच ! मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

    महिलेच्या संमतीशिवाय तिच्या कोणत्याही अंगाला स्पर्श करणं हा विनयभंगच . It is indecent to touch any part of a woman without her consent.


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : जालन्यातील एका तरुणाने 2014 साली शेजारच्या घरात अपरात्री घुसून महिलेच्या पायाला स्पर्श केला होता.याप्रकरणी पीडित महिलेनं विनयभंगाचा (Sexual molestation) गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित तरुणाला कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवत, त्याला दोन वर्षांचा सश्रम कारावास सुनावला होता.

    आरोपी तरुणाने कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

    मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने देखील कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मुकुंद सेवलीकर यांनी आरोपी तरुणाला दोषी ठरत त्याला दोन वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे.



    नेमकं प्रकरण काय?

    पीडित महिलेनं 5 जुलै 2014 साली घराशेजारी राहणाऱ्या परमेश्वर ढगे या तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. आदल्या दिवशी सायंकाळी आरोपी तरुण पीडित महिलेच्या घरी आला होता. यावेळी पीडितेचा पती घरी नसल्याचा आणि तो आज रात्री घरी येणार नसल्याची खात्री करून गेला होता. यानंतर रात्री अकराच्या सुमारास पीडित महिला घरात एकटी झोपली असताना, आरोपी तरुण पीडित महिलेच्या घरात शिरला होता.

    यावेळी त्याने पीडित महिलेच्या बेडवर बसून तिच्या पायांवरून हात फिरवला होता. पण हात फिरवताच जाग आल्याने पीडित महिलेनं आरडाओरड केली. यानंतर आरोपी घरातून पळून गेला.

    पीडित महिलेनं घडलेला सर्व प्रकार आपल्या नवऱ्याला सांगितला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी 5 जुलै 2014 रोजी पीडितेनं पोलीस ठाण्यात जाऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पण पीडित महिलेचा विनयभंग करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचं सांगत तरुणाने आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. पौगंडावस्थेत आल्यानंतर मुस्लीम मुलगी स्वत:च्या मर्जीने करू शकते विवाह, हाय कोर्टाचा मोठा निर्णय यावेळी न्यायमूर्ती सेवलीकर यांनी म्हटलं की, दोषी परमेश्वर ढगे याचं कृत्य विनयशीलतेला धक्का देणारं आहे.

    शिवाय एवढ्या रात्री महिलेच्या घरी जाण्याचं अन्य कोणतंही कारण नव्हतं. तसेच पीडितेच्या घरी जाऊन तिच्या बेडवर बसून तिच्या पायांना स्पर्श करणं, हे कृत्य लैंगिक हेतूने होतं.

    याबाबत समाधानकारण स्पष्टीकरण ढगे याला देता आलं नाही. शिवाय रात्रीच्या वेळी महिलेच्या संमतीशिवाय तिच्या कोणत्याही अंगाला स्पर्श करणं हा विनयभंगच होय, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. तसेच कनिष्ठ न्यायालयाने ढगेला दोषी ठरवण्यात कोणतीही चूक केली नसल्याचंही उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

    It is indecent to touch any part of a woman without her consent.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस