प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील 608 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागले यामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असून त्यांची भाजप खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे गट काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेनेचा ठाकरे गट यांचा नंबर लागला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर शरसंधान साधले आहे. It is clear from the statistics that Thackeray’s Shiv Sena is being eliminated by the NCP
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवतो आहे. हे आकडेवारीने सिद्ध झाले असे आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत आणि ट्विट करून स्पष्ट केले आहे.
आशिष शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्व. बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपविण्याचा घाट घालतोय. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी राज्यातला दोन नंबरचा पक्ष झाला असून शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. हीच भीती मा. एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेनेला संपवू पाहत आहे, हे आजच्या निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आतातरी उद्धव ठाकरे यांचे डोळे उघडतील, अशी आशा करू या.
भाजपकडे मराठी मतं होती आणि आजही आहेत. शिवसेनेने दावा केली की, गणेशोत्सव आणि दहीहंडी म्हणजे आम्हीच. त्यांना आता सत्याचा आरसा दिसला आहे. भाजपने सणांमध्ये कधीही राजकारण आणलं नाही. सणांमध्ये आम्ही केवळ सहभागिता देतो. आज दहीहंडी, गणेशोत्सवात मंडळाची सहभागिता आमच्या बाजूने दिसली.
It is clear from the statistics that Thackeray’s Shiv Sena is being eliminated by the NCP
महत्वाच्या बातम्या
- पवारांना धमकीचा फोन, पण बातमीचे पवारांनीच केले खंडन!
- दारूचा असर, विमानातून उतर : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जर्मनीत लुफ्थांन्सा कंपनीचा झटका?
- ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची सरशी; शिंदे गटाला ठाकरे गटापेक्षा अधिक जागा
- महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा; पण माजी मुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या तीन तऱ्हा