• Download App
    जणू काही भाजपने "मनीचे गुपित" प्रकाश आंबेडकरांना सांगितले; म्हणे भाजपमध्ये विलिनीकरणाची शिंदेंना अट!!It is as if the BJP told Prakash Ambedkar the secret of mind

    जणू काही भाजपने “मनीचे गुपित” प्रकाश आंबेडकरांना सांगितले; म्हणे भाजपमध्ये विलिनीकरणाची शिंदेंना अट!!

    प्रतिनिधी

    मुंबई : जणू काही 106 आमदार असणाऱ्या भाजपने “मनातले गुपित” विधानसभेत एकही आमदार नसलेल्या प्रकाश आंबेडकर यांना सांगितले आहे… भाजपने म्हणे एकनाथ शिंदे यांना पक्षात विलिनीकरणाची अट घातली आहे!! तसे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. It is as if the BJP told Prakash Ambedkar the secret of mind

    एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्याचा आजचा तिसरा दिवस आहे. त्यांच्या गटाच्या आमदारांची संख्या 41 वर पोचली आहे या गटाला अधिकृत मान्यतेसाठी आवश्यक असणारी 37 ही संख्या पूर्ण झाली आहे आहे पण तरीदेखील त्यांनी भाजप सोबत जाण्याचा कोणताही अधिकृत निर्णय त्यांनी जाहीर केलेला नाही.

    शिंदे गट आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे हे शिवसेना सोडणार की वेगळा गट करून भाजपला पाठिंबा देणार, यासंबंधीच्या बातम्या प्रसार माध्यमिक सूत्रांच्या हवाल्याने देत आहेत मात्र या बातम्यांच्या पलीकडे जाऊन आपल्याला सगळी माहिती आहे असा दावा करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट केले आहे.

    असे आहे प्रकाश आंबेडकरांचं ट्विट

    एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?, असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

    शिंदे यांच्या बंडामागे भाजपची आणि त्यातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तरीही एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजप काय आणि कशी भूमिका घेणार, याविषयी फडणवीस यांनी मात्र मी पुन्हा येईन सारखा अजून चकार शब्द काढलेला नाही.

    It is as if the BJP told Prakash Ambedkar the secret of mind

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस