वृत्तसंस्था
मुंबई : अरबी समुद्रातील चक्रीवादळानं केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र आणि गुजराजमध्ये काही तासांत होत्याचं नव्हतं केलं. कोरोनामुळं त्रस्त असलेले लोक उध्वस्त झाले. उरली सुरली हिंमत देखील तुटली, अशी दुःखद प्रतिक्रिया बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ता हिने व्यक्त केली. It didn’t happen, the courage was broken; Grief to actress Divya Dutta over the cyclone
एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावनांना वाट करून दिली. त्या म्हणाल्या,
“डोळ्यांसमोर मी माझ्या लोकांना उध्वस्त होताना पहात होते. जी झाडं मी दररोज मायेनं कुरवाळायची, ज्यांच्या सावलीत नैराश्य दूर करायची. ती झाडं काही तासांत मी मोडताना पाहिली. कोरोनामुळं आधीच होरपळेला सर्वसामान्य माणूस आता आणखी तुटला आहे.
कोरोनाशी संघर्ष करुन त्यानं जी हिंमत मिळवली होती ती या वादळामुळं त्यानं गमावली. काही तासांत त्याचा संसार उध्वस्त झाला. अन् मी हे सर्व केवळ पहात होते. कोणाचीही मदत करु शकले नाही. ही असाहयाता मला स्वस्थ बसू देत नाही आहे. यामुळं मला प्रंचड वेदना होत आहेत. असं दु:ख दिव्या दत्तानं व्यक्त केलं.”