• Download App
    लसीकरणानंतर कोरोनाची लागण होते का? केंद्र सरकारचे स्पष्टीकरण; वाचा प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर ...।Is corona contagious after vaccination? Explanation of the Central Government

    लसीकरणानंतर कोरोनाची लागण होते का? केंद्र सरकारचे स्पष्टीकरण; वाचा प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर …

    लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती वाढण्यास काही काळ लागतो. या दरम्यान लस घेणारा व्यक्ती कोरोना संक्रमिताच्या संपर्कात आल्यास त्यालाही कोरोनाची लागण होऊ शकते. 


    कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या व्यक्ती लवकर बऱ्या होतात. त्यांची प्रकृती कोरोनाची लस न घेतलेल्या व्यक्तींइतकी खालावत नाही. मात्र कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्ती इतरांसाठी धोकादायक ठरत आहेत. Is corona contagious after vaccination? Explanation of the Central Government


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एकीकडे कोरोनाचा कहर देशात वाढत आहे तर दुसरीकडे लसीकरण मोहिमेने देखील वेग धरला आहे. आत्तापर्यंत देशातील १३ कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. परंतु या लसीकरणानंतरही काहींना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे खरच लसीकरणानंतर कोरोनाची लागण होते का ? असा प्रश्न प्रतयेकालाच पडतोय.यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

    लसीकरणानंतर कोरोना होतो का? यावर भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB)ने अधिकृत ट्विटरवरून स्पष्टीकरण दिले आहे. PIB ने यावर सांगितले की, होय, लसीकरणानंतर काहींना कोरोनाची लागण होत आहे.



    परंतु लसीकरणानंतर फार कमी टक्के लोकांना कोरोनाची लागण होत आहे. अनेकांनाची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह येत आहे, परंतु त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याचे सरकारने म्हटले आहे.

    मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण फार महत्त्वाचे आहे. कारण ०.०३ – ०.०४ टक्केच लोकांनाच कोरोनाची लागण होत आहे आणि त्यांच्यात अतिशय सौम्य लक्षणे जाणवत आहेत. लसीमुळे कोरोनाचे गंभीर परिणाम जाणवत नसले तरीही लस घेतल्यानंतरही नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे .

    नियमांचे पालन न करणे

    कोरोनाची लस घेतल्यानंतर लस घेणारा व्यक्ती आता मला काहीही होणार नाही, असा विचार करून बिनदास्त फिरताना दिसतोय. यामुळे कोरोना नियमांचे पालन करण्याकडेही दुर्लक्ष होताना दिसतेय. सरकारकडून घालून देण्यात आलेल्या त्रिसूत्री (मास्क घाला, हात धुवा आणि सोशल डिस्टन्स पाळा) याकडे लोक दुर्लक्ष करत असल्याने लस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण होत आहे.

    दोन डोस वेळेत न घेणे

    लसीकरणानंतर कोरोनाची लागण न होण्यामागे एक कारण दोन डोस वेळेत घेणे हे देखील असल्याचे समोर आले आहे. काही लोक कोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे. दुसरा डोस वेळेत न मिळाल्यानेही लोक कोरोना संक्रमित होत आहेत, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे

    लसीकरणानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. कोणतीही लस पूर्णपणे एखादा आजार होण्यापासून रोखू शकत नाही, तर लस घेतल्यानंतर मृत्यूचा धोका कमी होतो, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. तसेच लसीकरणानंतर कोरोना झाला तर घाबरून जावू नका. लस घेतलेली असल्यामुळे यातून लवकर बरे होण्याचीच शक्यता अधिक असल्याचे डॉक्टर म्हणतात.

    याप्रकरणी जागतिक आरोग्य संघटनेने WHOने नमूद केले की, अनेक लोक कोरोना लसीकरणानंतर आजारी पडत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पण केंद्राने मंजुरी दिलेल्या कोणत्याही लसीमध्ये कोरोना पसरण्यास कारणीभूत घटक नसल्यामुळे कोरोनाविरोधी लस आपल्याला कोरोनाची लागण होण्यापासून बचाव करत आहे.

    लसीकरणानंतर शरीरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागतो, त्यामुळे लसीकरणानंतर आणि आधीही कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे लसीकरणानंतर आजारी पडू शकता. लस घेतल्यानंतर संरक्षण पुरविण्यासाठी वेळ लागत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

    Is corona contagious after vaccination? Explanation of the Central Government

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!