प्रतिनिधी
मालेगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नाशिक येथील मालेगाव येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. ज्यावेळी माझी मुलाखत होईल तेव्हा महाराष्ट्रात आणि देशात भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. Interviews etc. ok, but real earthquake when I speak says eknath shinde
जेव्हा माझी मुलाखत होईल तेव्हा…
आज मी जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही. पण योग्य वेळ आली की नक्कीच बोलेन. आता काही लोकांनी मुलाखतींचा सपाटा सुरू केला आहे. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यावेळी केवळ राज्यात नाही तर देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही, असे विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे.
जनेतेने आम्हाला स्वीकारले
आम्ही बंडखोरी किंवा गद्दारी केली नाही तर आम्ही राज्यात क्रांती घडवली. याची दखल जगातल्या 33 देशांनी घेतली. एवढा मोठा उठाव का होतो त्याच्या मूळाशी जाणं गरजेचं होतं. पण तसं न होता गद्दारीचा शिक्का आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. पण जनेतेने आमचा स्वीकार केला आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
– आमचा मुख्यमंत्री असूनही हतबल
ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपले राजकीय शत्रू मानले त्यांच्याशी कधीही मी मैत्री करणार नाही, हे बाळासाहेबांचे शब्द आहेत. बाळासाहेबांचे हेच विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. ज्या भाजपसोबत आपण युतीमध्ये लढलो त्यांच्यासोबत आम्ही जात आहोत. महाविकास आघाडीच्या काळात अनेक शिवसैनिकांवर खोटे खटले भरण्यात आले पण आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री असताना आम्ही काहीही करू शकलो नाही. त्यामुळे हे आम्हाला अजिबात मान्य नव्हते म्हणूनच आम्ही ही भूमिका घेतली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
Interviews etc. ok, but real earthquake when I speak says eknath shinde
महत्वाच्या बातम्या
- India TV survey : मोदी लाटेत काँग्रेस पुन्हा होणार भुईसपाट!!; प्रादेशिक पक्षांनाही मोठा फटका!!
- इंडिया टीव्ही सर्व्हे : लोकसभा निवडणुका झाल्या तर सरशी भाजप – शिंदे गटाचीच!!; राष्ट्रवादी सिंगल डिजिटमध्येच!
- हैदराबादचे भाग्यलक्ष्मी मंदिर चार मिनार पेक्षा पुरातन; ज्योतिरादित्य शिंदे यांचे भाग्यलक्ष्मीचे दर्शन!!
- ठाकरे घराण्यात उद्धव एकाकी; एकनाथ शिंदेंभोवती जमू लागला अन्य ठाकरे परिवार!!; स्मितानंतर निहार ठाकरे यांची भेट