• Download App
    आंतरराष्ट्रीय योग दिवस : राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा विधान भवनात आंतरराष्ट्रीय योगाभ्यास!!International yoga practice by Governor, Chief Minister, Deputy Chief Minister at Vidhan Bhawan

    आंतरराष्ट्रीय योग दिवस : राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा विधान भवनात आंतरराष्ट्रीय योगाभ्यास!!

    प्रतिनिधी

    मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त विधानभवन परिसरात विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांच्या पुढाकाराने ‘योग प्रभात’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. International yoga practice by Governor, Chief Minister, Deputy Chief Minister at Vidhan Bhawan

    राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन योगाभ्यास केला.

    शरीर, मनाच्या उत्तम आरोग्यासाठी योग करणे अत्यंत महत्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताण तणाव वाढले आहे. या ताण तणावावर योग हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. योग साधनेमुळे असाध्य आजारही बरे होतात. आज राज्यात सर्वदूर योग दिनाचे अनेक कार्यक्रम होत आहेत हे निश्चितच आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट असल्याचे मनोगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

    यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार विक्रम काळे, आमदार मनिषा कायंदे हे उपस्थित होते.

    International yoga practice by Governor, Chief Minister, Deputy Chief Minister at Vidhan Bhawan

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!