विशेष प्रतिनिधी
पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बेशिस्त वाहतूक नियंत्रित करt वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) कार्यान्वित होणार आहे. वाहनचालक-प्रवाशांचा प्रवास यामुळे अधिक सुरक्षित होईल.Intelligent traffic management system on Mumbai-Pune expressway, travel will be safer
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली निविदा प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण होणार आहे. आययटीएमएस यंत्रणा कार्यान्वित झाल्यास वेगाचे नियम मोडणाऱ्या, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांना शोधून काढत त्यांना जवळच्या टोलनाक्यावर रोखले जाणार आहे. त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल.
- मुंबई-पुणे दीड तासात तर नागपूर- मुंबई अंतर सहा तासांत, हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरवर चालणार बुलेट ट्रेन
कोरोना आणि आर्थिक अडचणीमुळे अत्याधुनिक अशी ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रकल्प दोन वर्षे रखडला होता; पण आता मात्र राज्य सरकारकडून ४० कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होणार असल्याने ‘आयटीएमए’च्या अंमलबजावणीसाठीची दोन वर्षांपासून रखडलेली निविदा महिन्याभरात अंतिम करण्यात येणार आहे. कंत्राटदार कंपनीची नियुक्ती करत महिन्याभरात काम पूर्ण करत द्रुतगती मार्गावरील प्रवास सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट एमएसआरडीसीचे आहे.
मुंबई-पुणे या ९४ किमीच्या द्रुुतगती मार्गावरून दिवसाला अंदाजे ६० हजार वाहने जातात. या मार्गावरील वाहतुकीसाठी अनेक नियम आखून देण्यात आले असून त्याचे काटेकोर पालन वाहनचालकांकडून केले जात नसल्याने द्रुतगती मार्गावरील अपघातांमध्ये मागील काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे.
द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी असलेली यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करून बेशिस्त वाहनचालकांना आळा घालण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी ‘आयटीएमएस’चा पर्याय निवडला आहे.
अंदाजे १६० कोटी रुपये खर्च करत ‘सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर ही यंत्रणा द्रुतगती मार्गावर कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानुसार संपूर्ण मार्गावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून ३९ ठिकाणी वाहनांचा वेग तपासणारी अॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टम’ बसविण्यात येणार आहे. ३४ ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना शोधणारी अशी ‘लेन डिसिप्लेन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टम’ बसविण्यात येणार आहे.
Intelligent traffic management system on Mumbai-Pune expressway, travel will be safer
महत्त्वाच्या बातम्या
- अनपेक्षितपणे सत्ता मिळाली! उध्दव ठाकरे यांनी थोबाडीत मारली तरी सरकारमधून बाहेर पडणार नाही, ज्येष्ठ मंत्र्यानेच म्हटल्याचा चंद्रकांत पाटील यांचा पोलखोल
- निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश फक्त निवडणूक आयोगाला, ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
- ऑनलाईन पोर्टल न्यूज लॉँड्री आणि न्यूज क्लिकच्या कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाचे छापे
- गणेशोत्सवाला प्रतिकूल दिलेले “बड्यांचे” अभिप्राय नंतर लोकमान्यांचे आणि गणेशोत्सवाचे ठरले भूषण…!!