कोरोनाचा प्रदुर्भाव कमी होत असल्यामुळे आणि जनतेच्या दबावामुळे नियमावली शिथिल करणे गरजेचे झाले आहे तर ह्या बाबतीत मुख्यमंत्री सायंकाळी आठ वाजता सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. Insult to national flag by CM Uddhav Thackeray during his speech, screenshot viral by asim sarode’s post
वृत्तसंस्था
मुंबई : लशीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाला मुभा देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर अखेर १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवासास परवानगी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा ह्या भाषणात करण्यात आली. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्ह करताना त्यांच्या मागे ठेवलेल्या झेंड्यांवरुन नवीन वाद निर्माण झालाय. पुण्यामधील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी यासंदर्भातील एक पोस्ट केली असून ती सध्या चर्चेत आहे.
सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या लाइव्ह भाषणामधील स्क्रीनशॉर्ट शेअर केला आणि मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वजासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे. “भारताच्या तिरंगा झेंड्याच्या वरच्या पातळीवर तसेच बरोबरीने इतर कोणताही झेंडा असू नये हा साधा नियम पाळावा अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती,” असं म्हणत सरोदे यांनी नाराजी व्यक्त केलीय.
नंतर या पोस्टमध्ये सरोदे यांनी मुख्यमंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तीने इतर झेंडा घेऊन बसूच नये असंही म्हटलं आहे. दुर्दैव आहे भारतीय लोकशाहीचे की आज आपल्या देशात राष्ट्रध्वज केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला उत्सवी स्वरूपात मिळविण्याच्या कामाचे राहिले आहेत की काय असा प्रश्न पडतो. अनेकांसाठी त्यांचे राजकीय पक्षांचे ध्वज व धर्म ध्वजच महत्वाचे आहेत,” असा टोलाही सरोदे यांनी लगावला आहे.
Insult to national flag by CM Uddhav Thackeray during his speech, screenshot viral by asim sarode’s post
महत्तवाच्या बातम्या
- कोविन अॅप जबरदस्त, कॉँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केले मोदी सरकारचे कौतुक
- महापुराच्या मदतीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, लाँगटर्म योजना करत आहोत, काही वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल !
- केंद्र सरकारने आरक्षणाची 50 टक्क्यांची अट शिथिल करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी
- पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत open debate; रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुख सहभागी होणार