Inspiring : कोरोना महामारीमुळे अवघ्या जगात हाहाकार उडालेला आहे. या संकटाच्या काळात देवदूत बनून लाखो डॉक्टर व आरोग्य कर्मचारी रुग्णसेवेत झटत आहेत. महामारीमुळे अगणित डॉक्टरांचेही प्राण गेले आहेत. तरीही न डगमगता त्यांची अखंड सेवा सुरू आहे. अशाच एका महिला डॉक्टरची प्रेरणादायी हकिगत येथे देत आहोत. Inspiring Work Of Lady Doctor During Corona Crisis in kalyan Dombilvali Hospital
वृत्तसंस्था
कल्याण : कोरोना महामारीमुळे अवघ्या जगात हाहाकार उडालेला आहे. या संकटाच्या काळात देवदूत बनून लाखो डॉक्टर व आरोग्य कर्मचारी रुग्णसेवेत झटत आहेत. महामारीमुळे अगणित डॉक्टरांचेही प्राण गेले आहेत. तरीही न डगमगता त्यांची अखंड सेवा सुरू आहे. अशाच एका महिला डॉक्टरची प्रेरणादायी हकिगत येथे देत आहोत.
डोंबिवलीच्या पालिका रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. दीपा बागरे या अनेकांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत. डॉ. दीपा बागरे यांना स्वत:ला रक्ताचा दुर्मिळ आजार आहे. असे असतानाही त्यांनी अखंडपणे आपली रुग्णसेवा सुरूच ठेवली आहे. कोरोना संकटाच्या अतिशय कठीण परिस्थितीतही डोंबिवलीतील पालिका रुग्णालायतील डॉक्टर यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा कर्तव्य निष्ठेने बजावले.
मागच्या पाच वर्षांपासून डॉ. दीपा बागरे या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात सेवा देत आहेत. त्या कोपरखैरणे येथे राहतात. लोकलनेच प्रवास करत रुग्णालय गाठतात. गेल्या 14 वर्षांपासून सिकल सेल एनेमिया या रक्ताच्या दुर्मिळ आजाराने त्या त्रस्त आहेत.
गंभीर आजाराशी सामना करत असताना देखील कोरोनाकाळात कर्तव्याला प्राधान्य देत त्यांनी वर्षभरापासून कोरोना रुग्णांची सेवा केली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना त्यांनाही कोरोनाने गाठले होते, मात्र इच्छाशक्ती व योग्य उपचारांच्या जोरावर त्यांनी कोरोना हरवलं व न डगमगता पुन्हा रुग्णांच्या सेवेत दाखल झाल्या. एकीकडे त्यांना असलेला आजार दुसरीकडे कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या त्या पेलत आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांची अविरत सेवा सुरू आहे. कुटुंबाचा, रुग्णलायतील वरिष्ठांच्या सहकार्याचाही आपल्याला पाठिंबा असल्याने आपल्याला ऊर्जा मिळते, असं डॉ. दीपा यांनी सांगितले.
Inspiring Work Of Lady Doctor During Corona Crisis in kalyan Dombilvali Hospital
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी : PM Kisan योजनेचा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा
- Wheat Procurement : केंद्राकडून शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ४९,९६५ कोटी रुपये, ३४.०७ लाख शेतकऱ्यांना फायदा
- ठाकरे सरकारचा १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला ब्रेक, राजेश टोपे म्हणाले, तूर्तास ज्येष्ठ नागरिकांना देणार प्राधान्य
- इटलीत नर्सने महिलेला नजरचुकीने एकाच वेळी दिले लसीचे 6 डोस, मग घडले असे काही…
- पलटवार : जेपी नड्डांचे सोनियांना पत्र, म्हणाले- महामारीच्या काळातील काँग्रेसचे वागणे जनता विसरणार नाही!