विशेष प्रतिनिधी
मुंबई : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून या बँकेच्या अनियमिततेच्या कारभाराची चौकशी सुरू असून लवकरच अहवाल प्राप्त होईल. यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर कारवाईसंबंधी विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली. या चर्चेत विधानसभा सदस्य सुभाष देशमुख,मदन येरावार, प्रकाश सोळंके यांनी भाग घेतला. Inquiry of Babaji Date Mahila Sahakari Bank of Yavatmal Start; Action in the Legislative Assembly
बाबाजी दाते महिला सहकारी बँक यवतमाळ ही बँक नोंदणीकृत सहकारी बँक असून या बँकेत ५३६.३१ कोटी रूपयांच्या ठेवी असून बँकेमार्फत ३३६.५२ कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.बँकेचा संचित तोटा १०८.६० कोटी रुपयेइतका आहे. या बँकेत बऱ्याच प्रकरणात अनियमितता आढळून आल्याबद्दल याची चौकशी सुरू आहे.
अनियमित कर्ज वाटप, कर्ज वसुलीसाठी ठोस कारवाई न करणे, चुकीच्या पद्धतीने ओ.टी.एस.योजना राबविणे आदी मुद्दयांचा त्यामध्ये समावेश आहे या चौकशी समितीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली.
Inquiry of Babaji Date Mahila Sahakari Bank of Yavatmal Start; Action in the Legislative Assembly
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेसच्या दारुण पराभवानंतर नाराज नेत्यांच्या जी-२३ गटाने पुन्हा खाल्ली उचल, पक्षाच्या नेतृत्वात बदल करण्याची केली मागणी
- घराणेशाहीच्या पक्षांना जनता नाकारतेय, कॉँग्रेस पुढील काळात जिल्ह्याचा पक्ष राहिल, आसामच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
- ममतांनी समाजवादी पक्षाच्या पराभवाचे खापर फोडले ईव्हीएमवर
- ममता माध्यमांवर भडकल्या, कॉँग्रेसवर बरसल्या, तृणमूलमध्ये कॉँग्रेसचे विलिनीकरण करून टाकण्याचेही केले आवाहन