विशेष प्रतिनिधी
पुणे: धर्मांतराला पाठिंबा देणाऱ्या संघटनांना मिळणाऱ्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय मुस्लीम मंचाचे राज्य अध्यक्ष अली दारूवाला यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. कोंढवा येथील संघटनांचा त्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.Inquire about funding of organizations who are promoting conversion, demands Ali Daruwala
जबरदस्तीने होणारे धर्मांतर व त्याअनुषंगाने उत्तर प्रदेशातील मौलाना कलीम सिद्दिकी यांची अटक या पार्श्वभूमीवर दारूवाला बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराच्या विरोधात यापुढे आक्रमक भूमिका घेतली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत जबरदस्तीने धर्मांतर करण्याची भूमिका आम्ही मान्य करणार नाही,
उत्तर प्रदेशातील संघटना जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या कामात आहेत. आपल्या लोकशाही देशात जबरदस्तीने धर्मांतरावर बंदी आहे. तरीही नियोजनपूर्वक धर्मांतर होताना दिसते. या मागे पैशाचा गैरवापर आहे.
महाराष्ट्र, पुणे आणि कोंढव्यातील संघटनांचा वापर केला जात असल्याचा आरोप दारुवाला यांनी यावेळी केला. या संघटनांना मिळणाऱ्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी अली दारुवाला यांनी केली. त्यातून अनेक गोष्टी बाहेर येतील, असेही दारुवाला त्यांनी सांगीतले.
Inquire about funding of organizations who are promoting conversion, demands Ali Daruwala
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई, कोकणासह अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता, आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू; 4 जिल्ह्यांत अलर्ट
- Mumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र केले दाखल, 346 पानांमध्ये 77 जणांचे जबाब
- राजीनाम्यानंतर सिद्धूंचा पहिल्यांदाच खुलासा, म्हणाले- कलंकित नेते परतणे मंजूर नाही, अखेरपर्यंत पंजाबसाठी सत्याची लढाई लढेन
- शिवसेना खा. भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ, ईडीचं समन्स, आधी निकटवर्तीयाला झाली अटक
- EXCLUSIVE : Only Agenda-Modi Hate कॉंग्रेसची गुंडगिरी-भाई जगतापांचा प्रताप! नरेंद्र मोदींवरील अभद्र मीमला उत्तर-अभिनेता रणवीर शौरींना धमकी ; शौरी म्हणाले हा फक्त मोदी-द्वेष