महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ केली आहे. शिवाय आजपासूनच अनेक सेवांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. काय आहेत हे बदल जाणून घ्या… Inflation shock Price increased by Rs 100 in commercial cylinder, TV and to mobile Recharge also expensive, these 7 changes from today
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ केली आहे. शिवाय आजपासूनच अनेक सेवांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. काय आहेत हे बदल जाणून घ्या…
व्यावसायिक सिलिंडर 100 रुपयांनी महाग
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2101 रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात ही किंमत 2000.50 रुपये होती. मात्र, घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमुळे रेस्टॉरंट आणि बाहेरील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात.
जिओचे रिचार्ज महाग
जिओने आजपासून आपले टॅरिफ प्लॅन महाग केले आहेत. आता जिओच्या ७५ रुपयांच्या प्लॅनसाठी १ डिसेंबरपासून ९१ रुपये भरावे लागतील. जिओचे रिचार्ज प्लॅन जवळपास 21% महाग झाले आहेत. आता 129 रुपयांच्या प्लॅनची किंमत 155 रुपये, 399 रुपयांच्या प्लॅनची किंमत 479 रुपयांची, 1,299 रुपयांच्या 1,559 रुपये, 2,399 रुपयांच्या प्लॅनची किंमत 2,879 रुपये असेल. टॉप-अपच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. 6 जीबी डेटासाठी 51 ऐवजी 61 रुपये, 12 जीबीसाठी 101 ऐवजी 121 रुपये आणि 50 जीबीसाठी 251 ऐवजी 301 रुपये मोजावे लागतील.
SBI क्रेडिट कार्डमध्ये शुल्क वाढ
SBI क्रेडिट कार्ड धारकांना या महिन्यापासून खरेदी करणे थोडे महाग होणारआहे. आता तुम्हाला SBI क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या EMI व्यवहारांसाठी अधिक पैसे द्यावे लागतील. SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (SBICPSL) ने जाहीर केले आहे की 1 डिसेंबरपासून EMI व्यवहारांसाठी, कार्डधारकाला आता 99 रुपये प्रक्रिया शुल्क आणि त्यावर कर भरावा लागेल.
DTH रिचार्ज महागले
आजपासून स्टार प्लस, कलर्स, सोनी आणि झीसारख्या चॅनेलसाठी 35 ते 50% जास्त पैसे द्यावे लागतील. सोनी चॅनल पाहण्यासाठी ३९ रुपयांऐवजी ७१ रुपये प्रति महिना मोजावे लागतील. त्याचप्रमाणे ZEE चॅनलसाठी 39 रुपयांऐवजी 49 रुपये प्रति महिना, तर Viacom18 चॅनलसाठी 25 ऐवजी 39 रुपये मोजावे लागणार आहेत.
पीएनबीच्या व्याजदरात बदल
देशातील दुसरी सर्वात मोठी बँक पंजाब नॅशनल बँकेने (PNB) खातेदारांना झटका दिला आहे. बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने बचत खात्यावरील व्याजदर 2.90 वरून 2.80% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. १ डिसेंबरपासून हे दर लागू झाले आहेत.
आगपेटीची किंमत दुप्पट
14 वर्षांनंतर आगपेटीच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. 1 डिसेंबर 2021 पासून आगपेटीच्या बॉक्ससाठी 1 ऐवजी 2 रुपये खर्च करावे लागतील. यापूर्वी वेळी 2007 मध्ये आगपेटीची किंमत 50 पैशांवरून 1 रुपये करण्यात आली होती. आगपेटी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने ही दरवाढ झाली आहे.
आधार UAN लिंकिंग अनिवार्य
युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) 30 नोव्हेंबरपर्यंत आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही ३० नोव्हेंबरपर्यंत तसे करू शकला नाहीत, तर १ डिसेंबरपासून तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान बंद होईल. याशिवाय जर तुम्ही आधार कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला EPF खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात.
Inflation shock Price increased by Rs 100 in commercial cylinder, TV and to mobile Recharge also expensive, these 7 changes from today
महत्त्वाच्या बातम्या
- सावरकर युग की गांधी युग!!; उदय माहुरकर – इरफान हबीब आमने-सामने!!
- ४१ वर्षीय शेतकऱ्याचे मरणाेपरांत अंगदान ; चिमुकलीसह चार जणांना नवजीवन मिळणार
- एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच ; अनिल परब यांनी दिली महत्वाची माहिती
- गोरगरीबांसाठीच्या उज्वला योजनेतही माध्यमाकडून राजकारण, मोदी सरकारने २०१९ पूर्वीच बहुतांश गरजुंपर्यंत पोहोचण्याचा केला प्रयत्न
- पोलीसच बनले वऱ्हाडी, पळून गेलेल्या युवक-युवतीचा पोलीस ठाण्यातच लावला विवाह