वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत आयटी एक्सपर्ट आहे भारताच्या शेजारच्या देशही आयटी एक्सपर्ट आहे पण भारत information technology मध्ये एक्सपर्ट आहे पण आपल्या शेजारच्या देशाचा एक्सपर्टाइज
IT म्हणजे international terrorist या विषयात आहे, असा टोला परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी लगावला आहे. भारताच्या परराष्ट्र नीती आणि कुटनीती संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आंतरराष्ट्रीय परिप्रेक्षात भारताची बदललेली भूमिका विशद केली. India IT expert, neighboring country also IT expert… but…; Foreign Minister S. Jaishankar’s gang
एस. जयशंकर म्हणाले :
नव्या जगात भारत “आयटी एक्सपर्ट” आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधला एक्सपर्ट आहे, पण आपला शेजारी देश देखील आयटी एक्सपर्टच आहे परंतु त्यांच्या आयटी एक्सपर्टचा अर्थ इंटरनॅशनल टेररिस्ट एक्सपर्ट असा आहे.
भारताने शेजारच्या देशाचा दहशतवाद वर्षानुवर्षी सहन केला आहे. परंतु, आता बदलत्या परिस्थितीत आपण जगाला देखील त्यांच्या दहशतवादाचा धोका समजावून सांगू लागलो आहोत.
दहशतवादात जगात इतरत्र कुठेतरी घडतो आहे. आपल्याला काय करायचे असे सुरवातीला जगातल्या काही देशांना वाटत होते. परंतु भारताच्या प्रयत्नातून जगाला त्याच्या खऱ्या धोक्याची देखील जाणीव झाली आहे.
शेजारच्या देशाचा दहशतवाद आज केवळ भारताचा विरुद्ध असला तरी तो उद्या तुम्हाला घेरेल हे समजावून सांगण्यात आता आपण भारतीय यशस्वी होतो आहोत.
जग देखील दहशतवादाकडे दहशतवाद या दृष्टीनेच बघते आहे. हे भारताच्या कूटनीतीचे यश आहे. अर्थात अजून आपण ठशीव पद्धतीने जगाच्या मनावर दहशतवादाचा धोका बिंबवला पाहिजे. त्यात आपण धीम्या गतीने का होईना पण यशस्वी होत आहोत.
India IT expert, neighboring country also IT expert… but…; Foreign Minister S. Jaishankar’s gang
महत्वाच्या बातम्या
- इंपोर्टेड संत्र्याच्या खोक्यात लपवून आणलेली तब्बल 1476 कोटी रूपयांची 207 किलो ड्रग्स वाशीत पकडली!!
- गडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
- पनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद
- द फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…