प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन मार्चपर्यंत सत्तांतर घडेल पण काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतील, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना ऊत आला.Independence will happen in March said Narayan Rane
त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे वेगवेळ्या बैठकींसाठी
दिल्ली मुक्कामी असल्याने या तर्कवितर्कांना मध्ये आणखीनच भर पडली. अटकळींचा बाजार गरम झाला. पण या अटकळींवर देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, “नारायण राणे नेमके काय म्हणाले हे मी ऐकलं नाही”, अशा मोजक्या शब्दात उत्तर देऊन त्यांनी सत्तांतराचा चर्चेतून आपले अंग काढून घेतले.
भाजपचे संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्यासमवेत मी आणि चंद्रकांत दादा पाटील यांची पाच तास बैठक झाली. यामध्ये फक्त भाजपचा संघटनात्मक विषय होता. बाकी कोणताही आमचा अजेंडा नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.
पण त्याचवेळी महाराष्ट्रातल्या इतर बाबींवर फडणवीस यांनी भाष्य केले. विधान परिषद निवडणूक चार मतदारसंघांमध्ये बिनविरोध होणार आहे तर दोन मतदारसंघांमध्ये लढत होते आहे. यामध्ये नागपूरची जागा आहे. भाजपचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उमेदवार आहेत, तर भाजपमधून कॉंग्रेसमध्ये गेलेले नगरसेवक रवींद्र उर्फ छोटू भोयर काँग्रेसचे उमेदवार आहेत. यावर प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, कि काँग्रेसला नागपुरात चमत्कार घडेल असे वाटत आहे पण असला चमत्कार नागपुरात पडत नसतो. चंद्रशेखर बावनकुळे हे व्यवस्थित मतांनी विधानपरिषदेवर निवडून येतील.
Independence will happen in March said Narayan Rane
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेसचा बंगळुरूमधील भंगारवाला देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार, १७०० कोटींहून अधिक संपत्ती, शिक्षण केवळ पाचवी
- मतांनी नव्हे तर लष्कराच्या पाठिंब्याने इम्रान खान सत्तेवर, नवाझ शरीफ यांना भ्रष्टाराचाच्या जाळ्यात अडकविण्याचाही कट
- WATCH : वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हिंगोलीत साकारतेय घनदाट जंगल
- सुप्रिम कोर्ट आदेश पाळत परमबीर सिंहांचे चौकशीत सहकार्य; साडेसहा तास चौकशीत सर्व आरोप फेटाळले!