• Download App
    INCREDIBLE INDIA : प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीने हातावर गोंदवला सीता मातेचा टॅटू ; फोटो शेअर करत लिहिलं जय माँ...। INCREDIBLE INDIA: Famous Hollywood Actress Gets Sita Mother Tattoo On Her Hand; Jai Maa wrote while sharing the photo ...

    INCREDIBLE INDIA : प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीने हातावर गोंदवला सीता मातेचा टॅटू ; फोटो शेअर करत लिहिलं जय माँ…

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय संस्कृतिची भुरळ जगभरात आहे . अमेरिकन अभिनेत्रीने जादा कोरीन पिंकीट स्मिथने अनेकदा तिचं भारतीय संस्कृतीबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. केवळ बोलण्यामधून हे प्रेम व्यक्त न करता आता आपल्या उजव्या हातावार सीता मातेचा टॅटू गोंदवून घेतलाय.हा भारतीय संस्कृतिचा सन्मान आहे. INCREDIBLE INDIA: Famous Hollywood Actress Gets Sita Mother Tattoo On Her Hand; Jai Maa wrote while sharing the photo …

    हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असण्याबरोबरच स्क्रीनरायटर, निर्माती, टॉक शो होस्ट आणि उद्योजिका असणाऱ्या जादाने या टॅटूचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलाय.



    ४९ वर्षीय जादाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये भविष्यात म्हणजेच वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत आपण संपूर्ण हातावर वेगवेगळे टॅटू काढून घेणार आहोत असंही म्हटलं आहे. “मी नेहमी वयाच्या ६० व्या वर्षी टॅटू काढून घेण्याबद्दल सांगते.

    मात्र भविष्याचं काही सांगता येत नाही. त्यामुळेच मी माझ्या हातावर आतापासून टॅटू काढून घेण्यास सुरुवात केलीय. हा एका देवीचा टॅटू असून आपल्या मनातील प्रवासाची आपल्याशिवाय केलेली सुरुवात दर्शवतोय.

    जय माँ,” अशी कॅप्शन जादाने हा फोटो शेअर करताना दिलीय. तिने काढलेल्या टॅटूमध्ये सीता मातेच्या अग्नीपरिक्षेच्या वेळेचा प्रसंग क्षण दाखवण्यात आला असून जादाने हा टॅटू फेमिनिझम म्हणजेच महिला सामर्थ्याचं प्रतिक असल्याचा उल्लेख केलाय. जादा ही प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता विल स्मिथची पत्नी आहे.

    INCREDIBLE INDIA : Famous Hollywood Actress Gets Sita Mother Tattoo On Her Hand; Jai Maa wrote while sharing the photo …

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!