वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईत ओमिक्रॉनचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे २०टक्के पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास सोसायट्या सीलबंद केल्या जाणार आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने संसर्गाचा धोका पाहता खाजगी रुग्णालय, सोसायटीबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. Increasing risk of Omicron in Mumbai: If more than 20% of patients are found, the society will seal it
मुंबईत ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात खासगी रुग्णालयांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे सुद्धा जारी केली आहेत. सर्व खाजगी रुग्णालयांना दुसऱ्या लाटेदरम्यानचे कोविड बेड पुन्हा सक्रिय करण्यास सांगितले आहे. यावरून मुंबईची परिस्थिती लवकरच बिघडणार आहे, हे सिद्ध होते. लक्षणे नसलेल्या रुग्णांना गरज भासल्यास रुग्णालयात दाखल करावे, असेही सांगण्यात आले आहे.