वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या उपसागरमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून चक्रीवादळामुळे उष्णतेची लाटेचा धोका वाढला आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम भारत आणि पश्चिम मध्यप्रदेशातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. Increase in maximum temperature, low pressure area in Bay of Bengal; Risk of heat waves due to cyclones
हिंदी महासागर आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. ते चक्रीवादळात परावर्तीत होईल. त्याचा परिणाम तापमानवाढीवर होणार आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागू शकतो.
चक्रीवादळामुळे १९ व २० मार्चदरम्यान अंदमान, निकोबार बेटांवर जोरदार वारे, मुसळधार पाऊस पडेल. यातून नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटा येणार आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले. सौराष्ट्र-कच्छच्या भागात उष्णतेच्या लाटेची तीव्र स्थिती नोंदवली गेली. कोकण-गोवा आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट नोंदवली गेली.
Increase in maximum temperature, low pressure area in Bay of Bengal; Risk of heat waves due to cyclones
महत्त्वाच्या बातम्या
- IT Raids Anil Parab : शिवसेनेचे मंत्री अनिल परबांशी संबधित 26 ठिकाणांवर इन्कम टॅक्सचे छापे!!
- बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ; तयारीचा आढावा
- Nawab Malik ED : राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिकांचे पंख छाटण्याचा निर्णय; “वाटचाल” राजीनाम्याच्या दिशेनेच… पण…!!
- मोहित चौहान यांची हिमाचल प्रदेशसाठी 3 कोटीची कोविड मदत