• Download App
    महाराष्ट्रात प्राप्तिकर विभागाचे 50 जागांवर छापे, 1050 कोटींचा व्यवहार उघड, मध्यस्थ-नोकरशहांचे धाबे दणाणले, सीबीडीटीची मोठी शोध मोहीम । Income Tax Department Raids At Multiple Locations In Mumbai, Pune, Nagpur Of Some Real Estate Developers

    महाराष्ट्रात प्राप्तिकर विभागाचे तब्बल 50 जागांवर छापे, काय-काय सापडलं? कोणाचे धाबे दणाणले? वाचा सविस्तर…

    Income Tax Department Raids : प्राप्तिकर विभागाने आज मुंबई, पुणे, नागपूर येथील रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या जागेवर छापे टाकले यांचे महाराष्ट्रातील एका मंत्र्याशी जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी आज ही माहिती दिली. विभागाने डायनॅमिक्स आणि डीबी रियल्टीच्या प्रवर्तकांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानी छापे टाकले. त्यांच्याकडून निधी मिळणाऱ्या साखर कारखान्यावरही छापा टाकण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर ठिकाणी सुमारे 50 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. Income Tax Department Raids At Multiple Locations In Mumbai, Pune, Nagpur Of Some Real Estate Developers


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने आज मुंबई, पुणे, नागपूर येथील रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या जागेवर छापे टाकले यांचे महाराष्ट्रातील एका मंत्र्याशी जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी आज ही माहिती दिली. विभागाने डायनॅमिक्स आणि डीबी रियल्टीच्या प्रवर्तकांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानी छापे टाकले. त्यांच्याकडून निधी मिळणाऱ्या साखर कारखान्यावरही छापा टाकण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर ठिकाणी सुमारे 50 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून अनेक मध्यस्थ- दलाल आणि नोकरशहांचे धाबे दणाणल्याची चर्चा सुरू आहे. नवी दिल्लीतील प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने या घडामोडींबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

    प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रातील काही व्यावसायिक/मध्यस्थ आणि सार्वजनिक कार्यालये धारण करणाऱ्या काही व्यक्तींचा समावेश असलेल्या एका मोठ्या सिंडिकेटवर शोध मोहीम राबवली होती. यामागची गुप्तचर माहिती 6 महिन्यांत विकसित केली गेली. एकूण 25 निवासी आणि 15 कार्यालय परिसर शोधात समाविष्ट करण्यात आले, तर 4 कार्यालये सर्वेक्षणाखाली होती. मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमधील काही सुइट्स दोन मध्यस्थांनी कायमस्वरूपी भाड्याने घेतले आणि त्यांच्या ग्राहकांना भेटण्यासाठी वापरले, त्यांचाही शोध घेतला. हे मोठे सिंडिकेट ज्यात व्यापारी/मध्यस्थ/सहकारी आणि सार्वजनिक कार्यालये असणारे व्यक्ती यांचा समावेश आहे, त्यांच्या नोंदींमध्ये विविध कोडनेमचा वापर करण्यात आला आणि एका प्रकरणात 10 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड होते. या शोधादरम्यान सापडलेले एकूण व्यवहार 1050 कोटी रुपयांचे आहेत.

    या मध्यस्थ लोकांनी कॉर्पोरेट्स आणि उद्योजकांना जमीन वाटपापासून ते सर्व सरकारी मंजुरी मिळवण्यापर्यंतची सेवा प्रदान केली. या लोकांनी संपर्कासाठीच्या साधनांच्या एन्क्रिप्टेड पद्धतींचा वापर करूनही प्राप्तिकर पथकाला गंभीर डिजिटल पुरावे पुनर्प्राप्त करण्यात यश आले. याद्वारे त्यांचे लपवण्याचे गुप्त ठिकाणह शोधण्यात आले, जेथे विविध गुन्हेगारी पुरावे सापडले. संपर्ककर्त्यांनी रोख हस्तांतरणासाठी ‘अंगडिया’चा वापर केला आणि शोधादरम्यान एका अंगडियाकडून 150 लाख रुपये जप्त करण्यात आले.

    पुनर्प्राप्त केलेल्या दस्तऐवजांमध्ये एकूण मिळणाऱ्या रोख रकमेचा सारांश आणि प्राप्त झालेल्या आणि प्राप्त करावयाच्या रकमेचा तपशील समाविष्ट आहे. ही प्रत्येक नोंद 200 कोटी रुपयांहून अधिक आहे. हे पैसे म्हणजे नोकरशहांनी एका विशिष्ट मंत्रालयाच्या अंतर्गत महत्त्वाची पोस्टिंग मिळवण्यासाठी, कंत्राटदारांकडून रोख रक्कम भरण्यासाठी इतर कामांतून उभारल्याचे आढळून आले आहे. हे सर्व उल्लेख कोडनेममध्ये आहेत.

    शिवाय, एका व्यावसायिक/मध्यस्थाने शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करून आणि सरकारी उपक्रम/मोठ्या कॉर्पोरेट्सकडे हस्तांतरित करून प्रचंड बेहिशेबी उत्पन्न जमा केले होते. अनेक वरिष्ठ नोकरशहा/त्यांचे नातेवाईक आणि इतर प्रमुख लोकांनी यात गुंतवणूक केल्याचे आढळून आले आहे.

    शोधादरम्यान, कार्यालयाच्या आवारात सापडलेल्या पुराव्यांमध्ये तारखेनिहाय विशिष्ट काळातील जवळजवळ 27 कोटी रुपयांचे ट्रॅन्झॅक्शन्स आणि जवळजवळ 40 कोटी रुपयांचे रोख पेमेंट यांचा समावेश आहे. यापुढील व्यवहारातील 23 कोटींचे पेमेंट विविध व्यक्तींना केले, ज्यांची नावे विविध कोडनेमसह नोंदवलेली आहेत. या मध्यस्थांना विविध उद्योजक आणि उद्योगपतींकडून सरकारी उपक्रमांच्या योजना, निविदा/खाण कराराचा विस्तार इत्यादींसाठी जमीन मिळण्यासाठी पैसे मिळतात. पुढे, व्हॉट्सअॅप चॅटमध्ये रोख व्यवहाराचे तपशील रोख रकमेच्या पावत्या दर्शवताना आढळले आहेत.

    शोधलेल्या काही व्यक्तींची स्वतःचे स्थावर मालमत्ता आणि बांधकाम व्यवसाय आहेत, त्या संदर्भात रोख पावत्या/देयके यांचे पुरावेदेखील सापडले आहेत. मोबाईल फोन, पेन-ड्राइव्ह, हार्ड ड्राइव्ह, आयक्लाउड, ई-मेल इत्यादींमधून प्रचंड डिजिटल डेटा जप्त केला गेला आहे आणि त्याची तपासणी आणि विश्लेषण केले जात आहे.

    आतापर्यंत 4.6 कोटी रुपयांहून अधिक रोख आणि जवळजवळ 3.42 कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. शोध मोहिमेदरम्यान सापडलेली 4 लॉकर्स रिस्ट्रेन ऑर्डर्समध्ये ठेवण्यात आली आहेत. पुढील तपास सुरू आहे.

    Income Tax Department Raids At Multiple Locations In Mumbai, Pune, Nagpur Of Some Real Estate Developers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित