प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पदाधिका-यांच्या निवडीपासून शिवसेनेबाबतचे अनेक निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत. आता शिंदे गटाने राज्यभरात ठिकठिकाणी पक्षाच्या शाखा आणि दादर व ठाणे येथे पक्षाचे मुख्यालय उभारण्याची घोषणा केली आहे. त्यातच आता मुंबईतील पहिल्या शाखेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले आहे.
बॅनरवरुन उद्धव, आदित्यना वगळले
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचा मतदारसंघ असलेल्या मानखुर्द येथे शिंदे गटाच्या शाखेचा नारळ वाढवण्यात आला आहे. या शाखेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो मात्र बॅनरवर लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शिंदे गटाची उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावरील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
प्रत्येक वॉर्डमध्ये शाखा
या शाखेचे उद्घाटन करताना खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रियी दिली. मुंबई शहरातला हा पहिलाच वॉर्ड येतो. मुंबई शहरात इथूनच प्रवेश करण्यात येतो. त्यामुळे इथे शिंदे गटाच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन होत आहे, याचा मला आनंद होतोय. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेनेच्या अशाच शाखा दिमाखात उभ्या राहतील, असेही राहुल शेवाळे यावेळी म्हणाले.
Inauguration of Shinde group Shiv Sena’s first branch in Mumbai No Uddhav + Aditya on the banner
महत्वाच्या बातम्या
- RSS Tiranga DP : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत यांनी बदलला ट्विटरचा डीपी, तिरंगा झळकला
- सलमान खानने मारलेल्या काळविटाचे उभारणार स्मारक, राजस्थानच्या बिष्णोई समाजाने केली घोषणा
- Salman Rushdie Health Updates : सलमान रश्दींवरील हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, लेखक व्हेंटिलेटरवर, एक डोळाही गमावण्याचा धोका
- ‘काळ्या पाण्याचा पहिला कैदी होता फजल’, ओवैसी म्हणाले- पंतप्रधानांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या मुस्लिमांचीही आठवण ठेवावी