अपघात कमी होण्याकरिता व वाहतूक सुरळीत करण्याकरिता सेव्ह लाईफ संस्थेने नाविन्य पूर्ण उपक्रम हाती घेतला आहे, या उपक्रमाद्वारे रस्ता सुरक्षाचे डिझाईन केले आहे. In undri area Save life foundation design saftey road and reduce the road accident technology
विशेष प्रतिनिधी
पुणे : अपघात कमी होण्याकरिता व वाहतूक सुरळीत करण्याकरिता सेव्ह लाईफ संस्थेने नाविन्य पूर्ण उपक्रम हाती घेतला आहे, या उपक्रमाद्वारे रस्ता सुरक्षाचे डिझाईन केले आहे, यामध्ये पादचाऱ्याची सुरक्षा याकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न संस्थेचा आहे, या डिझाईन द्वारे अपघात कमी झाल्यास इतर ठिकाणी ही या उपक्रमाचे अंमलबजावणी करणार आहोत असे पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
महापालिका व सेव्ह लाईफ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, अपघात कमी करण्याकरिता एक महिण्याचा प्रायोगिक प्रयोग करण्यात येत आहे. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी उपक्रमाची पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, पथ विभागाचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी,सेव लाईफचे मुख्य पियूष तिवारी,वाहतूक संतोष सोनवणे आदी उपस्थित होते. संस्थे द्वारे उंड्री व कोंढवा खडीमशीन चौकामध्ये, पादचारी व सायकलस्वार यांच्या सुरक्षेकरिता, रस्त्यावर डिझाईन ची आखणी केली असून,त्या ठिकाणाहून जाण्याकरिता त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे, त्याच बरोबर त्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया जाणून, त्याठिकाणी बदलही करण्यात येणार आहेत. चौकामध्ये आत्ता तात्पुरते प्लास्टिकचे दुभाजक उभे करण्यात आले आहेत, त्याद्वारे दुचाकी उ चार चाकी जड वाहनांना जाण्याकरिता दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत, या डिझाईन द्वारे, वाहतूक सुरळीत होते का नाही, याचा एक महिना अभ्यास केला जाणार आहे.
सेव्ह लाईफ संस्थेचे प्रमुख पियुष तिवारी यांनी सांगितले, आमच्या संस्थेने उंड्री व कोंढवा खडीमशीन चौक या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी व अपघात होत असतात, मागील तीन वर्षापासून उंड्री येथे ३५ खडी मशीन चौक येथे ६५ अपघात झाले आहेत, त्याचबरोबर मागील दोन महिन्यापूर्वी उंड्री येथे एका शाळकरी मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता, त्यामुळे या ठिकाणी पादचारी व रस्ता सुरक्षा सुरक्षिता करिता आम्ही एक नवीन डिझाईन तयार केले आहे, या वाहतुकीच्या डिझाईन द्वारे पादचारी व वाहनचालकांना सुरळीत प्रवास करता येईल, आमचा प्रयत्न आहे.
In undri area Save life foundation design saftey road and reduce the road accident technology
महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra Electricity Workers Strike : महाराष्ट्राला अंधाराचा धोका; वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर, उर्जामंत्र्यांसमवेत आजची बैठक रद्द!!
- सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलची दरवाढ
- युक्रेनचा रशियाशी तुर्कीमध्ये या आठवड्यात संवाद समोरासमोर चर्चा ही एक संधी; परिस्थिती खूप बिघडली
- तेलंगणात साकारले भव्य यदाद्री मंदिर , शिखर मढविले १२५ कोटीचा सोन्याने; १२०० कोटींचा खर्च