Friday, 9 May 2025
  • Download App
    संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक नगरीत चक्क रोबो करतो बाप्पाची आरती!!|In the sand industrial city of Sambhajinagar, a robot is doing Bappa's Aarti!!

    संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक नगरीत चक्क रोबो करतो बाप्पाची आरती!!

    प्रतिनिधी

    संभाजीनगर : वाळूज औद्योगिक नगरीतील मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर बी 12 या कंपनीत प्रोडक्शन विभागाने गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोटर सायकलचे चेसिस, मोटर सायकलचे पार्ट असेम्ब्ली बनवण्याचे काम चालते. या कंपनीत चक्क रोबो गणरायाची आरती दररोज करतो आहे.In the sand industrial city of Sambhajinagar, a robot is doing Bappa’s Aarti!!



    100 रोबो वेल्डर

    या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोटर सायकलच्या चेसिसला वेल्डिंग मारण्याचे काम रोबोद्वारे केले जाते, 100 रोबो मोटर सायकलच्या चेसिसला वेल्डिंग करतात. काम सुलभ करण्याकरिता रोबोच्या तंत्रज्ञानाचा वापर मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मोठ्या दिमतीने केल्याने कंपनीच्या उत्पादनाचा दर्जा आणि कामाचा वेळही सुखकर झाला आहे.

    आपल्या कंपनीची गुणवत्तेची कामाची वेळ सुलभ करण्यास रोबो महत्वपूर्ण हातभार लावत असल्याने कंपनीत प्रतिष्ठापणा केलेल्या गणरायाची आरतीही चक्क रोबोद्वारे केली जात आहे. बाप्पांची आरती करणारा रोबो औद्योगिक वाळूज नगरीत कुतूहलाचा विषय ठरत आहे.

    In the sand industrial city of Sambhajinagar, a robot is doing Bappa’s Aarti!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस