विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या शेलक्या शब्दांचे फटाके फुटत आहेत. हे फटाके फोडायला दुसरे तिसरे कोणी नसून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते पुढे सरसावले आहेत.In the politics of Maharashtra on the occasion of Diwali Padva, “shirt-pants
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी बिनआवाजाचे फटाके फोडा. धूर करू नका, असा महाराष्ट्राच्या जनतेला सल्ला दिला होता. त्यावर नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर “धूर” काढला. बारामतीतल्या भाषणात आवाज नव्हता आणि धूर पण नव्हता. होते फक्त प्रदूषण, अशी टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडे लाखो रुपयांचे शर्ट पॅन्ट आहेत, असा आरोप केला होता. त्यावर नारायण राणे यांनी नबाब मलिक हे लोकांचे शर्ट-पॅंट बघायला त्यांच्या बेडरूम मध्ये जातात का?, असा खोचक सवाल केला होता.
नारायण राणे यांच्या या राजकीय फटकेबाजीला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे यांनी महाराष्ट्रात जेवढ्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसले तेवढे दुसरे कोणी खुपसले नसतील. राणेंनी मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या पाठीत खंजीर खुपसलेत, असा आरोप विनायक राऊत यांनी केला.
तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना अटक बिटक काही होणार नाही. आघाडी सरकार पंचवीस वर्षे टिकेल. स्वतः नारायण राणे हेच भित्रे असल्यामुळे भाजपमध्ये गेले, असा आरोप नबाब मलिक यांनी केला आहे. एकूण दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांमध्ये शेलक्या शब्दांचे फटाके फुटताना दिसत आहेत.
In the politics of Maharashtra on the occasion of Diwali Padva, “shirt-pants
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे महापालिकेत महिलाराज ; नव्या सभागृहात ८७ नगरसेविकांचा पन्नास टक्के आरक्षणानुसार प्रवेश
- IND vs SCO T20 Playing 11: भारतीय संघाला स्कॉटलंडविरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागेल, ही शेवटची प्लेयिंग इलेव्हन असू शकते
- अनिल देशमुखांच्या कोठडीची मुदत संपण्यापूर्वी मुलगा ऋषिकेश देशमुखची ईडी चौकशी
- बीड : दिवाळी दिवशीच बस स्थानकातच चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न