विशेष प्रतिनिधी
सोलापूर : महापालिकेच्या वतीने पहिल्यांदाच काल मशिदीत लसीकरण शिबिर घेण्यात आले. तेलंगी पाच्छा पेठेतील नुरे इस्लामी मस्जिद ट्रस्टमध्ये आयोजित शिबिरात ४०० जणांना लस देण्यात आली.In the mosque of Solapur First time vaccination
शहरातील धर्मगुरू अबुल कलाम यांनी लसीकरणासाठी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.आगामी दिवसात शहरातील विविध प्रार्थना स्थळांमध्ये लसीकरण सत्र आयोजित करण्याचा मानस महापालिकेचा आहे.
तर बोगस लसीकरण झाल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त धनराज पांडेंनी दिला आहे.आजपर्यंत शहरातील ५ लाख ९० हजार लोकांनी पहिला डोस तर साडेतीन लाख लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.
- सोलापूरच्या मशिदीत प्रथमच लसीकरण
- नागरिकांचा आवाहनाला मोठा प्रतिसाद
- ४०० नागरिकांनी घेतला लसीचा डोस
- सर्व प्रार्थनास्थळात लसीकरण मोहीम
- सोलापूर महापालिकेचा स्तुत्य उपक्रम
- बोगस लसीकरण झाल्यास कडक कारवाई