प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदावर राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदन साठी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोले लगावले. In Rahul Narvekar congratulatory speech Chief Minister Eknath Shinde slammed Pawar-Thackeray
गेल्या 15 दिवसात एकनाथ शिंदे हे क्वचितच स्वतःहून पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांची बाजू नेहमीच आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद मांडली. परंतु, एकनाथ शिंदे यांनी प्रथमच विधानसभा सभागृहात आपली बंडखोरी मागची सविस्तर भूमिका मांडत नेमके कोणी काय केले याचा लेखाजोखा मांडला सादर केला. उद्या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी आणखी सविस्तर बोलू असे सांगून त्यांनी ठाकरे आणि पवारांना एक प्रकारे इशारा देखील दिला आहे.
शिंदे फडणवीस सरकार बनवण्याची छोटीशी कहाणीच त्यांनी सदनात सांगितली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला आधीच्या सरकारने तिलांजली दिल्यामुळे माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकांवर विश्वास ठेवून 50 आमदार मला पाठिंबा देत राहिले. माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि समोर मोठमोठे दिग्गज असताना आमदार माझ्याच बरोबर राहिले. ज्या दिग्गजांनी महाराष्ट्राचे अनेक वर्ष नेतृत्व केले आहे,
देशपातळीवर त्यांचे नेतृत्व पोहोचले आहे, अशा दिग्गजांनी प्रयत्न करून देखील माझ्या जवळच्या आमदारांना भुलविण्याचा प्रयत्न केला. पण आमदारांनी माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाची साथ सोडली नाही, याकडे एकनाथ शिंदे यांनी आवर्जून लक्ष वेधले. कोणी सांगत होते आमच्याकडे 20 आमदारांनी संपर्क केला. 25 आमदारांनी संपर्क केला. पण मी जेव्हा त्यांना सांगितले की तुम्ही नावे सांगा मी चार्टर्ड प्लेन करून पाठवून देतो किंवा कोणीही नाव सांगितले नाही आणि आज माझ्या पाठीशी 50 आमदार उभे राहिले, असे सभागृहात देखील दिसले असे एकनाथ शिंदे म्हणाले.
यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी तर्फे अजित पवार देखील बोलले.
In Rahul Narvekar congratulatory speech Chief Minister Eknath Shinde slammed Pawar-Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Nupur Shrama Row : नुपूर शर्माविरोधात कोलकाता पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस, जाणून घ्या, कोणत्या राज्यांत दाखल आहेत गुन्हे?
- Pakistan Blasphemy : पाकिस्तानमधील सॅमसंग कंपनीवर ईशनिंदेचा आरोप; प्रचंड गोंधळ, 27 कर्मचारी ताब्यात
- अमरावती हत्याकांड : मुख्य आरोपीच्या नागपुरातून आवळल्या मुसक्या, पोलिसांनी आठ दिवस झाकून ठेवले कारण
- द फोकस एक्सप्लेनर : शिंदेसेना की उद्धवसेना? कोणाचा व्हीप वैध? काय होणार परिणाम? कायदेशीर अडचण काय? वाचा सविस्तर