• Download App
    पिंपरी-चिंचवडमध्ये चुकला काळजाचा ठोका, ऑक्सिजनची गळती पण टळली नाशिकप्रमाणे दुर्घटना|In Pimpri-Chinchwad oxygen leak but avoided accident like Nashik

    पिंपरी-चिंचवडमध्ये चुकला काळजाचा ठोका, ऑक्सिजनची गळती पण टळली नाशिकप्रमाणे दुर्घटना

    पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजन टँकरमधून ऑक्सिजन टँक भरताना लिकेज होऊन मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन गळती झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, तातडीने गळती रोखण्यात यश मिळाल्याने नाशिकप्रमाणे दुर्घटना टळली.In Pimpri-Chinchwad oxygen leak but avoided accident like Nashik


    प्रतिनिधी

    पुणे : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजन टँकरमधून ऑक्सिजन टँक भरताना लिकेज होऊन मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन गळती झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, तातडीने गळती रोखण्यात यश मिळाल्याने नाशिकप्रमाणे दुर्घटना टळली.

    वायसीएम रूग्णलायाला ऑक्सिजन पुरवठा करणाºया एका आॅक्सिजन टँकरचा सेफ्टी वॉल लिकेज झाल्याने रूग्णालय परिसरात मोठ्याप्रमाणावर ऑक्सिजन गळती झाली होती. मात्र सुदैवाने प्रशासन व अग्निशामक दलाने वेळेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने, नाशिक दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली.



    ऑक्सिजन टँकमधून ऑक्सिजन गळती झाल्याची घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. तातडीने उपाययोजना करत गळती थांबविण्यात आली असून घटनास्थळी महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, राजेंद्र वाबळे यांनी धाव घेतली होती. नागरिकांनी घाबरून जाण्याच कारण नाही असं अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी स्पष्ट केले.

    नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला होता. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली होती. रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

    In Pimpri-Chinchwad oxygen leak but avoided accident like Nashik

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक