पुणे शहरात दिवसेंदिवस चोरी आणि घरफोडींच्या घटनांनी उच्छाद मांडला असून शहरात तीन घरफोडीच्या गुन्ह्यात चोरट्यांनी तब्बल 9 लाख 26 हजारांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे – पुणे शहरात दिवसेंदिवस चोरी आणि घरफोडींच्या घटनांनी उच्छाद मांडला असून शहरात तीन घरफोडीच्या गुन्ह्यात चोरट्यांनी तब्बल 9 लाख 26 हजारांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. वडगांव बुद्रुक, टिंगरेनगर आणि कोंढवा बुद्रुक येथे हा प्रकार घडला. In one day Three robbery cases registered in pune city
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पहिल्या घटनेत फिर्यादी प्रकाश रमेश धुमाळ (38, रा. ऐश्वर्या कुंज, दांगट पाटील नगर, वडगांव बद्रुक) हे काही कामानिमित्त बाहेर गेले असताना दि. 25 मार्चच्या रात्री दहा ते सव्वा अकराच्या सुमारास घराचे लॉक तोडून चोरटे आत शिरले. त्यांनी धुमाळ यांच्या घरातील 2 लाख 10 हजारांचे सहा तोळे दागिने, रोख रक्कम असा 2 लाख 11 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत कांचन प्रफुल मुळे (37, रा. प्रमोद अपार्टमेंट, टिंगरेनगर) यांचे राहते घर कुलुप लाऊन बंद असताना चोरट्याने कुलुप तोडून घरातील दहा हजारांची रोकड व 75 हजार रूपयांचे दागिने असा 85 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार शनिवारी सकाळी शनिवारी दुपारी दोन ते चार दरम्यान घडला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर अरविंद खेमचंद जैन (38, रा. प्राईम स्वेकर, व्हिआयटी हॉस्टेल चौक, कोंढवा) यांचे राहते घर कुलुप लाऊन बंद असताना चोरट्यांनी कुलुप तोडून 30 हजारांची रोकड, 6 लाखांचे अकरा तोळे दागिने असा 6 लाख 30 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी जैन यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरूध्द फिर्याद दिली आहे.
In one day Three robbery cases registered in pune city
महत्त्वाच्या बातम्या
- President Mayawati?? : मायावतींना राष्ट्रपतीपदाची ऑफर??; मायावतींनीच फेटाळली शक्यता!!
- Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बख्तियारपूरमध्ये मारहाण; युवक पोलिसांच्या ताब्यात
- एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ महाराष्ट्रातील वीज कर्मचारी भडकले; आज मध्यरात्रीपासून संपावर!!
- महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसवर