• Download App
    मुंबईत एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले, अपघातात कोणतीही जीवितहानी नाही । In Mumbai, three coaches of the Express derailed, no casualties were reported

    मुंबईत एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले, अपघातात कोणतीही जीवितहानी नाही

    वृत्तसंस्था

    मुंबई : दादर-पुडुचेरी एक्स्प्रेस आणि गदग एक्स्प्रेस मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकावर एकाच रुळावर आल्यावर एकमेकांना धडकल्या. या अपघातात पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. In Mumbai, three coaches of the Express derailed, no casualties were reported

    गाड्यांचे डबे आदळल्याने ओव्हरहेड वायर तुटली आणि त्यामुळे ठिणग्या उडून मोठा आवाजही झाला. ही घटना रात्री उशिरा सव्वा दहाच्या सुमारास घडली, पण या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.



    दादरहून पुद्दुचेरी एक्सप्रेस निघाली. तर गदग एक्सप्रेस सीएसटी येथून निघाली होती. ट्रॅक न बदलल्यामुळे गदग एक्स्प्रेसही पुद्दुचेरी एक्स्प्रेसच्या रुळांवर आली, त्यामुळे दोन्ही गाड्यांचे अनेक डबे एकमेकांवर आदळले. मात्र, दोन्ही गाड्यांचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातामुळे सध्या लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

    In Mumbai, three coaches of the Express derailed, no casualties were reported

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस