• Download App
    मोफत प्रवासाचा 1 महिना : महाराष्ट्रात 55 लाख जेष्ठ नागरिकांनी घेतला एसटीच्या योजनेचा लाभIn Maharashtra, 55 lakh senior citizens have benefited from the scheme of ST

    मोफत प्रवासाचा 1 महिना : महाराष्ट्रात 55 लाख जेष्ठ नागरिकांनी घेतला एसटीच्या योजनेचा लाभ

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकारने लागू केलेल्या एसटी मोफत प्रवासाचा लाभ एका महिनाभरात तब्बल 55 लाख नागरिकांनी घेतला आहे. २६ ऑगस्ट पासून मोफत प्रवासाला सुरुवात झाली. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृतज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले असून या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे. In Maharashtra, 55 lakh senior citizens have benefited from the scheme of ST

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. २६ ऑगस्ट ते २६ सप्टेंबरपर्यंत राज्यभरातून ५४ लाख ५८ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

    ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास, तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांना सर्व सेवांमधून ५० % सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. २५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ झाला होता. २६ ऑगस्ट पासून मोफत प्रवासाला सुरुवात झाली होती. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृतज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले असून या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.

    दररोज १ लाख ७५ हजार जणांना लाभ

    २६ ऑगस्ट ते २६ सप्टेंबरदरम्यान राज्यभरातून ५४ लाख ५८ हजारांहून अधिक म्हणजे दररोज सरासरी १ लाख ७५ हजार ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. या मोफत प्रवासात आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे.

    In Maharashtra, 55 lakh senior citizens have benefited from the scheme of ST

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस