कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस कमी झाला असला तरी पूर परिस्थिती कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला आणि पत्रकार परिषदेत त्याबाबत माहिती दिली. कोल्हापुरात मदत कार्य सुरु झाले आहे. In Kolhapur district Migration of over 1 lakh people
पूरपरिस्थिती 24 जुलै दुपारी 4 वाजता
1) स्थलांतर:- 76 हजार 26 व्यक्तींचे
1) नातेवाईकांकडे : 67 हजार 111 जण
2) निवारा कक्षेत 8 हजार 915
3) कोविड रूग्ण- छावणीमध्ये स्थलांतरीत :- 42
4) स्थलांतरीत जनावरे- 25 हजार 573
2) पूरबाधीत गावे:- 366
3) जिवित हानी:- 7 व्यक्ती
4) वित्त हानी:- 27 जनावरांचा मृत्यू
5) गर्भवती महिला :- 90 महिलांचे स्थलांतर, यापैकी 4 महिलांची यशस्वीरित्या प्रसूती झाली आहे.
6) महावितरण – जिल्हयातील 10 उपकेंद्रे बंद यात पूर्णत: बाधीत 111 गावे
अंशत: बाधीत 34 गावे
1 लाख 12 हजार 961 ग्राहकांच्या वीजपुरवठयावर परिणाम
75 हजार वीजवाहिन्या बंद
7) पाऊस
धरणक्षेत्र, आजपर्यंत झालेला पाऊस व याच दिवसापर्यंत मागच्या वर्षीचा पाऊस खालीलप्रमाणे-
राधानगरी- 2600- 1900
तुळशी- 2844- 1098
कासारी- 2717- 1797
कुंभी- 4352- 3597
कोल्हापूर- 943- 427
8) बंद मार्ग
राष्ट्रीय महामार्ग (NH4) शिरोली पुलाजवळ पाण्यामुळे बंद
राज्य मार्ग- 25 पैकी 17 राज्य मार्ग पाण्याखाली असल्याने बंद
तर 15 पूल पाण्याखाली
प्रमुख जिल्हा मार्ग-112 प्रमुख जिल्हा मार्गांपैकी 55 मार्ग पाण्याखाली असल्याने बंद तर 32 पूल पाण्याखाली
9) नळ पाणीपुरवठा योजना (केंद्र)- 399 बंद
आता पर्यंत 3 चालू झाल्या आहेत. येत्या 24 तासांत 38 सुरू होतील.
येत्या 48 तासांत 82 सुरू होतील.
येत्या 5 दिवसात 276 सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
10) जिल्हयात एनडीआरएफच्या 6 तुकडया दाखल झाल्या असून बचाव कार्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.
11) भारतीय लष्कर दलाची 70 जवानांची एक तुकडी शिरोळ परिसरातील मदत कार्यासाठी दाखल
12) अतिवृष्टीने बाधीत कुटूंबांना गहू, तांदूळ व तुरडाळ मोफत वाटप करण्यात येणार आहे.
13) दिव्यांग व्यक्तींना प्रती व्यक्ती 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. 24 हजार लाभार्थ्यांना 1 कोटी 21 लाख 21 हजार रुपये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वाटप करण्यात येणार आहेत.
- कोल्हापुरात यंदा पडला सर्वाधिक पाऊस
- गेल्या वर्षांपेक्षा अधिक पडल्याची आकडेवारी
- पंचगंगेच्या पाण्याची पातळी कमी होत आहे
- पाणी कमी होत असली तरी काळजी आवश्यक
- एक लाखांवर लोक स्थलांतरित झाले
- बाधीत कुटूंबांना गहू, तांदूळ व तुरडाळ मोफत
- लष्कराची तुकडी मदत कार्यासाठी दाखल
- आरोग्य, स्वच्छतेकडे आता लक्ष देण्याची गरज