• Download App
    झाडावर कुजलेल्या अवस्थेत मिळाला तरुणीचा मृतदेह IN Hinjewadi area २० yrs girl body found on river side tree, pcmc police commissioner visit the spot

    झाडावर कुजलेल्या अवस्थेत मिळाला तरुणीचा मृतदेह

    पुण्यातील हिंजवडी परिसरात मुळा नदीच्या काळावर एका झाडावर कुजलेल्या अवस्थेतील तरुणीचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे -पुण्यातील हिंजवडी परिसरात मुळा नदीच्या काळावर एका झाडावर कुजलेल्या अवस्थेतील तरुणीचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. २० ते २१ वर्षाच्या तरुणीचा हा मृतदेह असून ताे कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पाेलीसांसमाेर निर्माण झाले आहे. IN Hinjewadi area २० yrs girl body found on river side tree, pcmc police commissioner visit the spot

    याबाबत पिंपरी चिंचवड पाेलीस आयुक्तलयाचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले की, एका किराणा दुकानदाराच्या माध्यमातून पाेलीसांना संबंधित घटना समजली. किराणा दुकानात काही मजदूर सामान घेण्यासाठी येत हाेते व त्यांच्यात चर्चा हाेती की नदी किनाऱ्यावर एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आहे. याबाबतची माहिती मिळताच, हिंजवडी पाेलीस तातडीने घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी मृतदेह झाडावरुन खाली उतरवले. तीन ते चार आठवडयापूर्वी सदर तरुणीचा खून झाल्याची शक्यता आहे.



    खून करणाऱ्याने मृतदेह नदीच्या पाण्यात न टाकता झाडावर टाकला असून, नदीच्या पाण्यात मृतदेह वाहत जाऊन काेणाला मिळाल्यास तिची ओळख पटेल व गुन्हा उघडकीस येईल अशी शंका हल्लेखाेराला वाटली असावी. फाॅरेन्सिक टीमने घटनास्थळी जाऊन मृतदेहावरचे काही नमुने वैद्यकीय चाचणीसाठी ताब्यात घेतले आहे. संबंधित परिसरात मागील एक ते दीड महिन्यापासून काेणती महिला बेपत्ता झाली आहे का? याची तपासणी करण्यात येत आहे. त्याचसाेबत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची ही पाहणी करण्यात येत आहे. सदर तरुणीची लवकर ओळख पटविणे आणि आराेपींचा शाेध घेणे पाेलीसांसमाेरील आव्हान आहे.

    IN Hinjewadi area २० yrs girl body found on river side tree, pcmc police commissioner visit the spot

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!