प्रतिनिधी
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसला एमआयएम पक्षाबरोबर आघाडी करण्याची ऑफर देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आता शिवसेनेत मेख मारून ठेवली आहे. आपण आज लोकसभेत पोहोचलो असलो तरी त्यासाठी अब्दुल सत्तार यांनीच मला मदत केली आहे. सत्तार यांच्या मदतीमुळेच मी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करू शकलो, असे वक्तव्य इमतियाज जलील यांनी केले आहे. Imtiaz Jalil kills Shiv Sena abdul sattar
राष्ट्रवादी काँग्रेसला एमआयएम पक्षाशी आघाडी करण्याची ऑफर देऊन इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत आधीच मेख मारून ठेवली आहे. त्या पाठोपाठ आता खुद्द शिवसेनेत देखील त्यांनी आज अब्दुल सत्तार यांच्या बाजूने वक्तव्य करून मेख मारून ठेवली आहे.
इम्तियाज जलील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मधून निवडून आलेत. लोकसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी सध्या शिवसेनेत असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मदत केल्याचं सांगितलं आहे. अब्दुल सत्तार हे त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे तत्कालीन खासदार चंद्रकात खैरे यांचा पराभव केला होता. इम्तियाज जलील यांनी त्यावेळची निवडणूक एमआयएमतर्फे लढवली होती, इम्तियाज जलील यांना वंचितचा पाठिंबा देखील होता.लोकसभेत निवडून जाण्यापूर्वी इम्तियाज जलील हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य होते. अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत वैजापूर तालुक्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते.
– अब्दुल सत्तार त्यावेळी काँग्रेसमध्ये
2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने एमआयएमसोबत महाराष्ट्रात उमेदवार दिले होते. वंचित आणि एमआयएच्या आघाडीने 48 जागा लढवल्या होत्या. या आघाडीचे खासदार म्हणून इम्तियाज जलील निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसमध्ये असणारे आमदार अब्दुल सत्तार यांनी इम्तियाज जलील यांना त्यावेळी मदत केल्याचं इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे.
– चंद्रकांत खैरे अस्वस्थ
अब्दुल सत्तार यांनी मदत केल्यामुळे चंद्रकांत खैरे यांचा पराभव करू शकलो, असे वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केल्यानंतर खुद्द चंद्रकांत खैरे देखील अस्वस्थ झाले आहेत. अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत घेऊन त्यांना मंत्री केले. त्यामुळे ते अस्वस्थ आहेतच. पण त्यात इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे भर देखील पडली आहे.
Imtiaz Jalil kills Shiv Sena abdul sattar
महत्त्वाच्या बातम्या
- कुणी घर देता का घर…!!
- THE KASHMIR FILES : विवेक अग्निहोत्री यांच्या हिमतीची दाद ! The kashmir Files सारखे आणखी सिनेमे यायला हवेत मला – भूमिका करायला आवडेल नवाजुद्दीन सिद्दीकी..
- #KejriwalAgainstHindus : काश्मिरी हिंदू विरोधात वक्तव्य करणाऱ्या अरविंद केजरीवालां विरुद्ध उसळला संताप!!
- एएनआयने चोरला स्मृति इराणी यांचा फोटो, माझा फोटो आणि क्रेडीट दुसऱ्याचे का असा केला इराणींनी सवाल