• Download App
    गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, आशा भोसले यांनी दिली माहिती। Improvement in the health of singer Lata Mangeshkar, information given by Asha Bhosale

    गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, आशा भोसले यांनी दिली माहिती

    कोरोनातून बरं होण्यासाठी किमान सात दिवस लागतात, त्यामुळे लतादीदींना अजून रुग्णालयातच उपचार घ्यावे लागणार आहेत. Improvement in the health of singer Lata Mangeshkar, information given by Asha Bhosale


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहे.दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टर प्रतीक समदानी यांनी दिली. कोरोनातून बरं होण्यासाठी किमान सात दिवस लागतात, त्यामुळे लतादीदींना अजून रुग्णालयातच उपचार घ्यावे लागणार आहेत.लतादीदींची बहीण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी लतादीदींच्या प्रकृतीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.



    “लतादीदींना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत, मात्र त्यांचं वय ९२ वर्षे असल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे,
    मी त्यांना भेटायला गेले होते, पण रुग्णालयाच्या आत जाण्याची परवानगी मिळाली नाही. कोरोना महामारीमुळे कडक नियमांचं पालन करावं लागत आहे.पण दीदींच्या प्रकृतीत सुधारणा आहे. आधीपेक्षा त्या आता बऱ्या आहेत. उषा त्यांच्या संपर्कात असून व्हिडीओ कॉल्सद्वारे त्या आम्हाला लतादीदींच्या प्रकृतीविषयी माहिती देतात.”

    Improvement in the health of singer Lata Mangeshkar, information given by Asha Bhosale

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना