• Download App
    सुषमा अंधारेंची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करा; वारकऱ्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी Immediately expel Sushma Andharen from Shiv Sena

    सुषमा अंधारेंची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करा; वारकऱ्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

    प्रतिनिधी

    पुणे : सुषमा अंधारे ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ विश्व वारकरी सेनेने गंगासागर येथे घेतली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या हिंदू धर्मियांच्या देव देवतांबद्दल बोलतानाचा व्हिडीओ समाज माध्यमावर सध्या व्हायरल होत आहे. आता या व्हिडीओमुळे वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. Immediately expel Sushma Andharen from Shiv Sena

    विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी पश्चिम बंगालच्या गंगा सागर येथील समुद्र किनारी उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. राज्यातील वारक-यांना शपथ देऊन सुषमा अंधारे ज्या पक्षात जातील त्या पक्षाला मतदान न करण्याचे म्हटले आहे. आगामी काळात राज्यातील वारकरीदेखील अशी शपथ घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात सुषमा अंधारे व वारकरी संघटना यांच्यात नवीन संघर्ष बघायला मिळू शकतो.

    …तर शिवसेना भवनासमोर महाआरती करणार 

    सुषमा अंधारेंची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी याआधी मराठा युवा सेनेनेदेखील केली होती. अंधारे यांचे हिंदुत्व खोटे आहे. त्यांची हकालपट्टी न केल्यास शिवसेना भवनासमोर महाआरती करणार असल्याचा इशारा मराठा युवा सेनेने दिला आहे.

    Immediately expel Sushma Andharen from Shiv Sena

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार